वर्डी ग्रामपंचायतीच्या दप्तराची व बँक व्यवहाराची अपूर्ण असलेली चौकशी पूर्ण करून अहवाल देण्याची मागणी
वर्डी ता.चोपडा दि.२३(प्रतिनिधी डॉ रवी कोळी)येथील ग्रामनिधी व पाणीपुरवठा निधी दप्तराची चौकशी अद्याप अपूर्ण राहिलेली आहे.त्यानुसार पंचायत समिती चोपडा गट विकास अधिकारी यांनी आलेल्या तक्रारीकडे हेतू पुरस्कर दुर्लक्ष करून संबंधित अपहार कर्त्याना पाठीशी घातल्याचे दिसून आले आहे सखोल चौकशी न करता वेळकाढूपणा करीत आहेत ग्रामपंचायतीचे विविध बँकांमध्ये तीन ते चार अकाउंट असून त्यांचीही चौकशी अपूर्ण राहिलेली आहे. मागील दोन वर्षापासून चालत असलेल्या चौदाव्या वित्त आयोगाची कामाविषयी नागरिकांनी निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याची तक्रार केली असून, चौकशीची मागणीहक अर्जदार व ग्रामस्थांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे .१२ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आत्मदहनाचा इशारा नंतर, फेर चौकशीला २८ ऑक्टोंबर व १९ नोव्हेंबर रोजी दोन दिवसात झालेल्या विकास कामांची स्थळ चौकशी करण्यात आली. चौकशी अधिकारी निशा जाधव यांच्या पथकाने अनेक बोगस कामांचा उलगडा ग्रामस्थ समोर झाला. त्यामध्ये सात ठिकाणी थापे , मातंग वाडा व चांभार वाडा या ठिकाणी पेव्हर ब्लॉक , हरी पंढरीनाथ पाटील यांच्या घर परिसरात काँक्रिटीकरण, बंदिस्त गटारी ,झालेल्या कामांच्या जागा बदल ठराव, दोन पाणी पंप सेट, ॲम्बी नुसार कामे नाही, ग्रामपंचायत वाल कंपाऊंड अपूर्ण अवस्थेत, ग्रामपंचायत मागील गेट, मरीमाता मंदिर पर्यंत पेवर ब्लॉक इतक्या कामावर झालेला स्थळ निरीक्षण करतेवेळी निर्दशनास प्रत्यक्षात आढळली नाहीत . तसेच चौकशीदरम्यान ग्रामनिधी व पाणीपुरवठा निधी, दप्तराची चौकशी झालेली नाही. वेळ झाल्यामुळे नंतर चौकशी ला येऊ असे सांगून चौकशी अधिकारी अध्यक्ष निशा जाधव सह पथक निघून गेले. त्यानंतर कोणीही चौकशीला आलेले नाही. पूर्वसूचना न देता आत्मदहनाचा इशारा. अनेक वेळा अर्ज फाटे करूनही वेळेवर चौकशी होत नाही. मोठ्या प्रमाणात हेलपाटे मारूनही कार्यालयाच्या फेर्या मारूनही दोन वर्षे झाली .तरी ही चौकशी पूर्ण होत नाही. त्यासाठी उपोषण केले .आत्मदहनाचा इशारा दिल्या नंतर त्यांनी स्थळ चौकशी पूर्ण केले. परंतु ग्रामनिधी, पाणीपुरवठा निधी बँक अकाउंट पाहणे ,आरो प्लांटची चौकशी झालेली नाही .अनेक वेळा लेखी व तोंडी सांगूनही वेळेत चौकशी होत नसल्यामुळे मानसिक त्रास असाह्य झाल्यामुळे आठ दिवसात चौकशी न झाल्यास, व पूर्वसूचना न देता बीडीओ यांच्या केबिनमध्ये आत्मदहन करणार असल्याचे व माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार शासन राहील असे तक्रार दार दत्तात्रय विजय पाटील यांनी सांगितले . चौकशी अधिकारी एस टी मोरे नको मागील दोन वर्षापासून चाललेल्या विकास कामांचा चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे त्यामुळे अधिकारी व पदाधिकारी यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. चौकशी अधिकारी एस टी मोरे यांनी यांनी प्रशासक म्हणून वर्डी ग्रामपंचायत मध्ये काम पाहिले आहे. त्या काळातही ग्रामनिधी व पाणीपुरवठा निधी यांच्यातही लाखो रुपयाचा घोळं असल्याचे व त्यांचे पुरावेही तक्रार दत्तात्रय पाटील यांच्याकडे आहेत त्यामुळे एसटी मोरे हे योग्य तपास किंवा चौकशी करणार नाहीत यात शंका असल्यामुळे तक्रारदार दत्तात्रय पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे म्हणून चौकशी अधिकारी त्रयस्थ असावा अशी मागणी केली. गृहमंत्र्यांना दिले निवेदन तक्रार दार दत्तात्रय पाटील यांनी १९ रोजी चोपडा तालुक्यातील दौऱ्यावर आलेले गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना वर्डी ग्रामपंचायतीच्या दप्तराची व बॅंक खात्याची अपहार चौकशीसाठी निवेदन दिले सदर कामांची चौकशी अपूर्ण आहे ती पुर्ण करुन लवकर अहवाल मिळण्याची मागणी केली आहे