आशापुरी माता पाटण ( शिंदखेडा ) येथे २६ डिसेंबर रोजी टोकरे कोळी जमातीचा वधु - वर परिचय मेळावा
म्हसावद,ता.शहादा (प्रतिनिधी अब्बास भिल) :आशापुरी माता पाटण ( शिंदखेडा ) येथे २६ डिसेंबर २०२१ रोजी वार रविवार रोजी टोकरे कोळी जमातीचा वधु - वर परिचय मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. या मेळाव्यात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी टोकरे कोळी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तर्फे करण्यात आले आहे. लग्न म्हटले म्हणजे वधू- पाहण्याची मोठी कसरत असते. त्यातच वेळ आणि पैसा खर्च होतो, या साऱ्या गोष्टी लक्षात घेता वधूवर परिचय मेळावा घेण्याची समाज मान्यता पुढे आली आहे. त्याला चालना देण्यासाठी आदिवासी टोकरे कोळी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाने व्हाटसएप (१ते२१)ग्रुप तयार करुन धुळे, नंदुरबार, व जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाजातील भावी वधू वर यांचा बायोडाटा तयार करण्याचे काम २०१६ पासुन हाती घेतले होते, वर्षाला १००० बायोडाटा येत असतात संस्थेचे सुचक मंडळ मार्फत २०० विवाह जुळवुन आलेले असतात त्याला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद देखील मिळाला आहे. याच माध्यमातून अनेक कुटुंबियांच्या पाल्याचे विवाह जुळुन आलेत. आता त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी २६ डिसेंबर रोजी भव्य वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज बांधवांनी उपस्थित राहवे असे आवाहन आदिवासी टोकरे कोळी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था च्या वतीने करण्यात आलेले आहे.यातआदिवासी कोळी समाज समन्वय समिती महा. राज्य,
वाल्मिकलव्य सेना महा.राज्य.,वाल्या सेना धुळे नंदुरबार,
वाल्मिकी साम्राज्य शहादा,
आखिल भारतीय कोळी समाज, राणी झलकारीबाई कोळी संस्था महा.राज्य, आदिवासी विकास संघ महाराष्ट्र राज्य टोकरे कोळी युवा मंच शहादा, कर्मचारी संघटना नंदुरबार, आदिवासी टोकरे कोळी युवा मंच धुळे, कोळी महा संघ महा. राज्य,आदिवासी कोळी समाज ऐकता मंच नाशिक,
फ्रेंडस् सर्कल ग्रुप सुरत,
आदिवासी कोळी समाज समन्वय समिती सुरत शहर,
झुंजार फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्था, जिव्हाळा ग्रुप वधु वर सुचक मंडळ जळगाव,
लिलामाई फाऊंडेशन वधू वर जळगाव, निस्वार्थी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य, युगल स्टडी पाॅइंट धुळे,कोळी समाज सेवाभावी संस्था नंदुरबार, यंदा कर्तव्य आहे ग्रुप कुसुंबा, टोकरे कोळी हक्क प्रबोधन समिती शहादा आदी.संघटनेचे सहकार्य लाभणार आहे.