पंकज प्राथमिक विद्यालयात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत...


 




 पंकज प्राथमिक विद्यालयात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत...

   चोपडा दि.०१( प्रतिनिधी) :---

      कोरोनामुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा तब्बल दिड वर्षांनंतर सुरू झाल्या आहेत. १ डिसेंबर पासून राज्यांतील शाळांची घंटा वाजली आहे. राज्य सरकारने परिपत्रक काढून कोरोनाचे नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात दोन व्यक्तींमध्ये शक्यतोवर किमान सहा फूट अंतर ठेवणे , प्रत्येकाने फेस मास्क वापरणे , वारंवार हात धुणे , शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कोवीड लसीकरण इत्यादी सूचना सूचित करण्यात आल्या आहेत.

        पंकज प्राथमिक विद्यालयात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. त्यात पाण्याचा सडा , रांगोळी , फुगे , रंगीबेरंगी पताका , बँड पथक इत्यादी तयारी करण्यात आली होती. पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले व विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील यांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्यास पेन्सिलीचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमापीने टेंपरेचर तपासण्यात आले तसेच विद्यार्थ्यांचे हात सनीटाईज करण्यात आले.

       पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना आनंददायी गीते ऐकविण्यात आली , तसेच आनंददायी गीते गायन करण्यात आली. एका बाकावर एक विदयार्थी बसवून अध्यापन करण्यात आले.

        कार्यक्रम यशस्वीतेसाठी सी एस जाधव , ए सी पाटील , सी आर चौधरी, डी एम जैस्वाल, गायत्री शिंदे , आर डी पाटील , वाय के चौधरी , मनोज अहिरे, प्रशांत पाटील, महेश गुजर, गोपाल पाटील, मयूर पाटील, स्वप्निल ठाकूर, प्रफुल्ल महाजन, सचिन लोखंडे, नितिन वाल्हे, जयश्री पाटील, धनश्री जावळे, प्रियंका पाटील आदींनी परिश्रम घेतले.

       कार्यक्रमाचे आयोजन व नियोजनासाठी शेखर पाटील , सईद शेख , दिलीप बाविस्कर , रवि शार्दुल , कैलास चौधरी, प्रमोद पाटील आदींनी परिश्रम घेतले....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने