बापरे..बाप.. जिल्ह्यात रावेर येथील घटनेत ब्राऊन शुगरसह एक महिला पोलीसांच्या ताब्यात



बापरे..बाप.. जिल्ह्यात  रावेर येथील घटनेत ब्राऊन शुगरसह एक महिला पोलीसांच्या ताब्यात 

जळगावदि.१८ ( प्रतिनिधी)

जळगाव पोलीस दल व एलसीबी पथकाच्या संयुक्त कारवाईत आज रावेर येथील आंबेडकर चौकात ब्राऊन शुगरसह महिलेस अटक करण्यात आली आहे. या महिलेकडून 500 ग्रॅम ब्राऊन शुगर हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अक्तरी बानू रा. बुरहानपूर मध्यप्रदेश असे पोलिसांच्या ताब्यातील महिलेचे नाव आहे. सदर महिलेने हे ब्राऊन शुगर सलीम खान शेर बहादूर खान (रा. मंदसोर मध्य प्रदेश) याचेकडून घेतले होते असे सांगण्यात आले आहे. 


या गुन्ह्यात महिला पोलिसांच्या ताब्यात असून तिने ज्या व्यक्तीकडून हे ब्राऊन शुगर आणले होते त्या सलीम खान याच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना झाले आहे. सदर अमली पदार्थ हा ब्राऊन शुगर असल्याचे तपासणीत निष्पन झाल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. बाजार भावानुसार ब्राऊन शुगरची किंमत एका किलोसाठी 5 कोटी सर्वसाधारणपणे असते. हस्तगत करण्यात आलेल्या अमली पदार्थाची अंदाजे किंमत 1 कोटी लावण्यात आली आहे. सदर महिला टॅक्सीने बुरहानपूर येथून रावेर येथे आली होती. एलसीबी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तिला रावेर येथे ब्राऊन शुगरसह ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास रावेर पोलीस करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने