*वंचितची ओबिसिसाठी विधानभवनावर धडक, कार्यकर्त्यांची धरपकड बुलडाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा सहभाग*
जळगाव दि.२४( प्रतिनिधी)
ओबीसींच्या आरक्षणासाठी 23 डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात विधानभवनावर वंचितच्या शेकडो कार्यकर्त्यांनी धडक दिली. ओबीसींना आरक्षण मिळालच पाहिजे, अशी मागणी करतच हे आंदोलक विधानभवन परिसरात धडकले. अचानक शेकडो कार्यकर्ते आल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली. पोलिसांनी जमाव पांगवायला सुरुवात केली. तसा जमाव अधिक आक्रमक झाला. आंदोलक अधिकच आक्रमक होत असल्याचं पाहून पोलिसांनी आधी प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पोलीस आणि आंबेडकरांची चर्चा सुरू असतानाच इकडे आंदोलकांच्या जोरजोरात घोषणाही सुरू होत्या. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांची तात्काळ धरपकड करण्यात येवून आझाद मैदान येथे आणण्यात आले.
या आंदोलनात बुलडाणा जिल्ह्यातील पदाधिकारी जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे,जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे,जेष्ठ नेते शरद भाऊ वसतकर,दक्षिण जिल्हाध्यक्ष निलेश जाधव,जी.उपाध्यक्ष शंकरराव इंगळे,भगवान इंगळे,प्रभाकर वरखेडे,मिलिंद वानखेडे, संघपाल पणाड,गौतम इंगळे,शैलेश भारसाकळे,नितेश गवई यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणावरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालंच पाहिजे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना केलीच पाहिजे. एकदा जनगणना केली तर राजकीय आरक्षणही आपोआप मिळेल,या सरकारने केवळ ओबीसीच नव्हे तर मराठा आरक्षणाचंही वाटोळं केलं आहे त्यामुळे आता हे आंदोलन गाव पातळीपर्यंत होईल असे ते म्हणाले