यात्रा उत्सव बघण्यासाठी आलेल्या भाचाचा करुण अंत..नळाचे पाण्याने घातला जीवावर घाला*


 



यात्रा उत्सव बघण्यासाठी आलेल्या भाचाचा करुण अंत..नळाचे पाण्याने घातला जीवावर घाला*

यावल दि.१९ : तालुक्यातील डांभूर्णी येथे यात्रेसाठी मामाच्या गावाच्या गावी आलेल्या 10 वर्षीय भाच्याचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. भावेश साई नाथ बागुल (रा. कोळगाव ता. भडगाव) असे त्याचे नाव आहे.
इलेक्ट्रीक मोटारीचा लागला शॉक गावातील यात्रेनिमित्त डांभुर्णी येथील रहिवासी सागर अशोक सपकाळे यांच्याकडे बहिण व भाचे आले होते. शुक्रवारी दुपारी ग्रामपंचायतीकडून नळांना पाणीपुरवठा सुरू होता. यावेळी सपकाळे यांच्या घरात पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार लावली होती. यादरम्यान घराच्या ओट्यावर पाणी सांडले. याच ओल्या ओट्यावर पंपाच्या वायरमधून वीज प्रवाह उतरला होता. नेमका यावेळी सागर सपकाळे यांचा भाचा भावेश बागुल (वय 10) हा खेळण्यासाठी पायात चप्पल न घालताच घराबाहेर निघाला मात्र ओल्या ओट्यावर शॉक लागून तो खाली कोसळून बेशुद्ध झाला. यानंतर त्याला जळगाव येथे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शुक्रवारी रात्री डांभुर्णीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने