विवाहितेचा विनयभंग चौघांवर गुन्हा*

 




विवाहितेचा विनयभंग चौघांवर गुन्हा
*
पाचोरा दि.१९ : तालुक्यातील सावखेडा खुर्द येथे 21 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी चार जणांविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाचोरा तालुक्यातील सावखेडा खुर्द येथील 21 वर्षीय महिला या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. शनिवार, 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास महिला घरात असतांना गावातील साईनाथ शिवाजी गोपाळ, नवनाथ शिवाजी गोपाळ, सुनीता साईनाथ गोपाळ आणि सोनाली नवनाथ यांनी महिलेचा घरात येवून महिलेला शिवीगाळ व मारहाण करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी महिलेने पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेवून चौघांविरोधात तक्रार दिल्यावरून संशयीत आरोपी साईनाथ शिवाजी गोपाळ, नवनाथ शिवाजी गोपाळ, सुनीता साईनाथ गोपाळ आणि सोनाली नवनाथ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार विजय माळी करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने