महिला सरपंचाच्या हत्येचं गूढ उलगडलं, जंगलात विवस्त्र अवस्थेत सापडला होता मृतदेह... जुन्या भांडणाचा त्याने काढला काटा. आणि अडकला पोलीसां जाळ्यात..
गडचिरोली दि.३० ( प्रतिनिधी चक्रधर मेश्राम) रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एका गावातील महिला सरपंचाचा मृतदेह सोमवारी विवस्त्र अवस्थेत आढळून आला होता. महिला सरपंचाची हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या महिलेचा जंगल भागात मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याने हत्येपूर्वी या महिलेवर बलात्कार झाल्याची शक्यता वर्तवली जात होती.
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली असता गावातील एका संशयित 30 वर्षीय तरुणाला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला खाक्या दाखवताच त्याने सदरील महिलेची हत्या केल्याची कबूली दिली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरुन महिलेचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली.
अमिर शंकर जाधव (वय 30 वर्ष) असं आरोपी तरुणाचे नाव असून त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 376 म्हणजे बलात्काराचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाडचे उप विभागीय पोलिस अधिकारी निलेश तांबे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पूर्वीच्या भांडणाचा राग धरुन आरोपीने महिलेला जीवे ठार मारल्याची कबुली दिल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले.
महाड तालुक्यातील एका गावाच्या महिला सरपंचाचा सोमवारी दुपारी खून झाला होता. विवस्त्र अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी महाड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर महाड तालुका पोलिसांनी नऊ टीम बनवून तपास सुरु केला. तपास कामात डॉग स्क्वॉडची मदत महत्त्वपूर्ण ठरली.
दरम्यान, मृत महिला सरपंचाचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला होता. त्यांच्या डोक्यावर लाकडासारख्या वस्तूने जोरदार प्रहार करण्यात आला होता. घटनास्थळी त्यांना फरफटत आणल्याच्याही खुणा सापडल्या होत्या. त्यामुळे अन्य ठिकाणी त्यांची हत्या करुन मृतदेह जंगलात टाकल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता.
महिला सरपंच सकाळी चुलीसाठी लाकडं गोळा करायला घराबाहेर पडल्या होत्या, मात्र दुपारी दोन वाजताच्या सुमारास एका व्यक्तीला जंगलात त्यांचा मृतदेह आढळला. त्याने पोलीस पाटलांच्या माध्यमातून महाड पोलिसांना याविषयीची माहिती दिली होती.