साकळी येथील हजरत सजनशाह वली(रहे.) यांच्या उर्स सोहळ्यास आजपासून सुरुवात ..उर्सास शेकडो वर्षाची परंपरा.. कोरोना नियमांचे पालन केले जाणार

■ साकळी ता. यावल येथील हजरत सजनशाहवली(रहे.) बाबांच्या दर्गा (छाया :गोकुळ कोळी मनवेल )



साकळी येथील हजरत सजनशाह वली(रहे.) यांच्या उर्स सोहळ्यास आजपासून सुरुवात ..उर्सास शेकडो वर्षाची परंपरा.. कोरोना नियमांचे पालन केले जाणार

मनवेल  ता. यावल दि.२८(वार्ताहर) - साकळी येथील हजरत सजनशाह वली(रहे.) यांच्या ऎतिहासिक उर्स सोहळ्यास आज दि.२९ रोजी पासून सुरुवात होत आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या या उर्स सोहळ्यास शेकडो वर्षाची परंपरा आहे.या दिवशी सालाबाद प्रमाणे बाबांच्या संदल निमित्त वाजत - गाजत बाबांच्या पवित्र मझार वर चादर चढविली जाणार आहे. संदल निमित्त जिल्ह्यातुन नव्हे तर जिल्ह्याबाहेरुन तसेच महाराष्ट्राबाहेरुन हजारो भाविक भक्त बाबांच्या दर्ग्याच्या दर्शनासाठी येतात.या उर्साच्या दरम्यान कोरोनाच्या नियमावलीचे पालन केले जाणार आहे.

 ●हिंदू- मुस्लिम ऐकतेचे प्रतिक-हा उर्स गावाचा सांस्कृतिक व धार्मिक वारसा असून ऐकतेचे प्रतिक आहे.प्राचीन काळी डांभूर्णी ता.यावल येथील राजपूत परिवारातील महिला राजवंतीबाईस  हजरत सजनशाह वली(रहे.) बाबांनी बहिण मानून राखी बांधून घेतली व राखीची भेट म्हणून जमिनी दिल्या. तेव्हा पासून वंश परंपरेने या महिलेच्या परिवारातुन आजही एकादशीला संदल निमित्त सर्वप्रथम बाबांच्या पवित्र मझ़ार वर चादर चढविली जाते.तसेच साकळी येथील मुजावर  हाजी मीरा सैय्यद वजीर यांच्या घरून परंपरागत पद्धतीने कोरोना नियम पाळत संदल मिरवणूक काढली जाणार आहे हाजी मीरा सैय्यद यांच्या 

निधनानंतर त्यांचे पुत्र व माजी ग्रा.प. सदस्य मुजावर सै.अहमद सै.मीरा हे संदल काढण्याची वारसा चालवत आहेत.  

●ऐतिहासिक दर्गा - हजरत सजनशाह वली(रहे.) यांचे नाव शाह अ.लतीफ (रहे.) असे आहे. ख्याजा अजमेरी यांच्या सहकाऱ्यांमध्ये गणना होते.बाबा शेकडो वर्षापुवीं साकळी येथे आले. त्यांचा दर्गा ऐतिहासिक आहे. दर्गा चारही बाजूंनी पाहिल्यावर सारखाच दिसतो.दर्गा अतिशय कलाकुसरतेने बांधलेला असून लाकडाचा दरवाजा आहे.

●आम लंगरचा कार्यक्रम- संदल निमित्त दि.२९ रोजी बुधवार रोजी  कय्युमशाह बाबा व त्यांचे सहकारी व गावकऱ्यांच्या मदतीने दर्गापरिसरात लंगरे आम( महाप्रसाद) ठेवला आहे.हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेणार आहे. त्याचप्रमाणे रात्री दर्गासमोर महफिले- समाँ या कार्यक्रमात शहजाद सुल्तानी (चोपडा ) कव्वाल हे ईश्वरभक्ती व नआत म्हणून भाविकांना मंत्र -मुग्ध करणार आहे.या दर्गापरिसरात उर्स निमित्त पाच बाजार भरविले जातात.या उर्स दरम्यान सर्वत्र उत्साहाचे व धार्मिक वातावरण असते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने