*दोनगावकरांनो आवाज द्या, आम्ही तुमच्यासाठी अर्ध्या रात्रीही हजर आहोत. - जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील*

 





*दोनगावकरांनो आवाज द्या, आम्ही तुमच्यासाठी अर्ध्या रात्रीही हजर आहोत. - जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील*

धरणगाव दि.२६(प्रतिनिधी):दोनगाव खु येथे नूतन ग्रामपंचायत इमारत बांधकाम व संरक्षण भिंतीचे भूमीपूजन जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते झाले याप्रसंगी बोलत होते. महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वछतामंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघात कोट्यवधीचा निधी आणून शाश्वत विकास साधला आहे. गावाचा कायापालट करायचा असेल तर लोकसहभाग अत्यावश्यक आहे. आज ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले लवकरच इमारत पूर्णत्वास येईल. नाल्यामुळे रस्ता खचत होता. ग्रामस्थांनी मंत्रीमहोदयांना निवेदन दिले. त्यांनी त्वरित संरक्षण भिंतीसाठी निधी मंजूर केला. कामाचा दर्जा उत्तम राखला जावा अशा सूचना मी अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत. येत्या कालावधीत गावात आणखी विकासकामे करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखवला. याप्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, सरपंच भागवत पाटील, उपसरपंच अंजनाबाई प्रकाश पाटील, ग्राप सदस्य ज्योतीबाई पाटील, प्रकाश पाटील, बापू पाटील, गुणवंतराव पाटील माजी उपसरपंच सुरेश देवराम पाटील, दोनगाव बु चे क्रांतीकुमार सोनवणे, मधुकर पाटील, धुडकू पाटील, हेमंत पाटील, अमोल पाटील युवा सैनिक, रामकृष्ण अहिरे, जितेंद्र पाटील, नाना दगा पाटील, ग्रामसेवक किशोर खोडवे, पोलीस पाटील भरत पाटील, देविदास पाटील व मान्यवर, ग्रामस्थ

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने