*चोपडा नगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प म्हणजे दुग्धशर्करेचा मेळ.. निरोगी आरोग्यासाठी जीवनदायी तर कंपोस्ट खत निर्मितीने आर्थिक बळ देणारे..* *गटनेते "जीवनभाऊचे" जीवनदायी विचार एकदम टाईट..! बायोगॅस वीज निर्मितीने आठशे पोलवर लागतील लाईट..!!*






 *चोपडा नगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प म्हणजे दुग्धशर्करेचा मेळ.. निरोगी आरोग्यासाठी जीवनदायी तर कंपोस्ट खत निर्मितीने  आर्थिक बळ देणारे..* *गटनेते "जीवनभाऊचे"  जीवनदायी विचार एकदम टाईट..! बायोगॅस वीज निर्मितीने आठशे पोलवर लागतील लाईट..!!*

चोपडा दि.३०( खास रिपोर्ट :महेश शिरसाठ) :
सडलेला.. कुजलेला अन् दूर्गंध सोडणाऱा कचरा म्हटलं की,नाका-तोंडावर हात गेल्या शिवाय राहत नाही.. अशा कचऱ्यापासून मनुष्य दोन हात लांबच राहतो..मात्र अशा हजारो टन दर दिवशी तयार होणाऱ्या कचऱ्याचा शांत डोक्याने विचार केला तर तो अवाढव्य ढीग डोळ्यासमोर आणला की डोकें गरगरल्या शिवाय राहणार नाही.. इतकेच काय पाहिल्यानंतर उलटी झाल्याशिवाय राहणार नाही..याचा सारासार विचार करून शहरातील लाखो लोकांचा आरोग्य हित लक्षात घेऊन चोपडा नगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला उदयास आणून कंपोस्ट खताच्या निर्मितीस प्रारंभ केला आहे.या जनहित प्रकल्पाने जन मानसांचे खराब होणारे आरोग्याचे संरक्षणाचे महान कामं केलेआहे.ईतकेच नव्हे कंपोस्ट खत निर्मिती ने शहराच्या विकासासाठी आर्थिक बळ ही उभे राहिले आहे.एकंदरीत हा प्रकल्प चोपडेकरांसाठी दुग्ध शर्करा योगच आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.. एव्हढे मात्र खरे..!
या समाज हित प्रकल्पांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी झटपट पोलखोल न्यूज प्रतिनिधींनी प्रत्यक्ष प्रकल्पास भेट दिली असता..असाध्य गोष्टी चोपडा यांसारख्या लहान शहरांतही साध्य होऊ शकतात.. पण् त्यासाठीं  हवी असते ती करुन  दाखविण्याची जिद्द..ते गटनेते जीवनभाऊ  चौधरी यांच्या टीमने करून दाखविले..   जनतेला  प्रकल्पाची माहिती व्हावी त्यासाठी थोडक्यात गोषवारा..!

नगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारुन शहरातील घाणं घालवून स्वच्छतेचा कळस गाठून" सुंदर शहर स्वच्छ शहर" चा झेंडा रोवून शहरात एक आगळावेगळा अभिनव उपक्रम राबवून शहराच्या मानाच्या तूऱ्यात  एक फुल रोवण्याचे योगदान दिले आहे.


या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात दिवसभरात दोन टर्म मध्ये ३२ गाड्यां घनकचरा संकलन केले जात आहे.त्यात ओला कचरा,सुका कचरा,व घरगुती घातक कचरा तीन प्रकारच्या कचऱ्याचा समावेश आहे.हा सर्व कचरा संकलन करून प्रकल्पात आणला जातो.त्यात विलिनीकरण करून ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करण्यात येत आहे यात साधारणतः नासका भाजीपाला,पाला पाचोळा,नासके अन्न पदार्थ व कुजणारे गवत असतें.हे सर्व घटक प्राथमिक कटींग मशीन मध्ये टाकून बेड तयार करण्यात येतात ते बेड २०ते३०दिवसपडून झाल्यावर कल्चर च्या सहाय्याने खाली वर करून ४१दिवस पूर्ण झाल्यानंतर गाळणी मशीनवर लावून उत्कृष्ट कंपोस्ट खत तयार होते.ते खत ऊस, द्राक्ष, मोसंबी आदी फळ बागायत पिकांवर फायदेशीर ठरेल आहे.त्यामुळे या खतास मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.शिवाय या खताचा वापर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या वृक्ष लागवड वाढीवर  उपयोगी ठरत आहे.यामुळे घाण नष्ट होऊन खताची निर्मिती होत असल्याने नगरपालिकेस आर्थिक हातभार ही लागतं आहे
या प्रकल्प निर्मितीमागे दूरगामी विचार करण्यात आला असून शहरातील वीजनिर्मिती प्रकल्प ही उभारला जात आहे.तर कोरड्या कचऱ्यात सेग्रीकेशन करुन प्लास्टिक पिशव्या, गोणपाट,बॅग,कांचन झाडू,गादी भंगार, रबर, कागदी पुठ्ठे हे सर्व एम. आर.एफ.  मशीनवर वेगवेगळे करून  बेलींग मशीनवर लाऊन गठाण तयार करून विक्री केले जाते.तसेच घरगुती घातक कचऱ्यात सॅनिटरी पॅड ,मेडिसीन व दवाखान्यातील वेस्टेज मटेरियलचा समावेश आहे त्यांची खोल खड्ड्यात पुरून विल्हेवाट लावली जाते. अशी माहिती संबंधितांकडून दिली गेली.







हजारो टन कचऱ्यापासून दर दिवशी दोन ते चार क्विंटल कंपोस्ट खत निर्मिती होत असल्याने हा प्रकल्प खाजगी मक्तेदाराला ठेका देण्यात आला आहे नगरपालिकेने हा प्रकल्प उभारुन विविध प्रकारच्या रोगराई पासून  नागरीकांची सुरक्षा करुन उत्पन्नाचे आर्थिक साधनं म्हणून उपयोगात आणल्याने दुग्धशर्करा योग च् घडवून आणला असे म्हणणे वावगे ठरणार नाही एवढे मात्र खरे..!याच कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प ही उभा होत आहे त्यामुळे नगरपालिकेला भविष्यात फार मोठा फायदा होणार आहे..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने