मुंबई येथे 27 डिसेंबर रोजी डाक अदालतचे आयोजन

 



मुंबई येथे 27 डिसेंबर रोजी डाक अदालतचे आयोजन

         जळगाव, दि. 03 (प्रतिनिधी) : मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई यांच्यातर्फे 27 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता मुख्य पोस्ट मास्तर जनरल, मुंबई यांच्या कार्यालयात 117 वी डाक अदालत होणार आहे.  या डाक अदालतमध्ये टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत बॅंक खाते ,मनीऑर्डर या संदर्भातील तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह करावा. डाकसेवेबाबची तक्रार दोन प्रतीत सहाय्यक निदेशक (तक्रार) तथा सचिव डाक अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे कार्यालय, जी.पी.ओ. बिल्डिंग, दुसरा माळा, मुंबई 400001 यांच्या नावे 10 डिसेंबर, 2021 पर्यंत पाठवावी, असे अधीक्षक डाकघर, जळगाव डाक विभाग, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने