औरंगाबाद येथे 10 डिसेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन
जळगाव, दि. 03 (प्रतिनिधी) : पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद यांच्यातर्फे 10 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता पोस्ट मास्तर जनरल यांच्य कार्यालयात डाक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. या अदालतमध्ये विशेषत: टपाल वस्तू, मनी ऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र आदींबाबत तक्रारी विचारात घेतल्या जातील. संबंधितांनी डाकसेवेबातची तक्रार दोन प्रतीत ए. के. धनवडे, सहाय्यक निदेशक डाकसेवा (ज. शि) पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, औरंगाबाद -431 002 या पत्त्यावर आठ डिसेंबर 2021 पूर्वी पोहोचेल, अशा बेताने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहितीसाठी www.maharashtrapost.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. असे पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद क्षेत्र, औरंगाबाद यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.