साकळी येथील शारदा विद्या मंदीर शाळेत रांगोळी स्पर्धेचे आयोज




 साकळी येथील शारदा विद्या मंदीर शाळेत रांगोळी स्पर्धेचे आयोजन

मनवेल  ता.यावल दि.२५ (प्रतिनीधी) महाराष्ट्र शासनाच्या तंबाखू मुक्त शाळा अभियाना अंतर्गत साकळी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेत दि २४ रोजी तंबाखू मुक्त शाळा या विषयावर शालेय पातळीवर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १२ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता व तंबाखू मुक्त शाळा या विषयावर नाविन्यपूर्ण व सामाजिक संदेश देणाऱ्या विविध अशा पोस्टर रांगोळ्या साकारल्या होत्या.

         या स्पर्धेदरम्यान संस्थेचे अध्यक्ष वसंतराव रामजी महाजन, तसेच कार्याध्यक्ष सुभाष महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्या तसेच संचालिका सौ.विद्याताई महाजन, संचालिका सौ.सुनंदा बडगुजर, संचालक मुक्तार तडवी, सुरेश लोधी, प्रमोद सोनवणे,सचिव गंगाराम तायडे,प्राचार्य जी.पी. बोरसे यांनी भेट देऊन सहभागी स्पर्धक विद्यार्थिनींचे कौतुक केले.

               सर्वच रांगाेळ्या खूप सुंदर व नावीन्यपूर्ण असून सर्वच रांगोळ्यांच्या माध्यमातून तंबाखू मुक्त शाळा या विषयीचा सामाजिक संदेश प्रकर्षाने दिला जात आहे. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून खरोखर रांगोळी कला टिकविली जात आहे.असे संस्थाध्यक्ष वसंतराव महाजन यांनी सांगितले. सदर स्पर्धा राबविण्यासाठी प्राचार्य जी.पी. बोरसे,पर्यवेक्षक एस.जे.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कलाशिक्षक जे.पी.पाटील व त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकांनी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने