शहादा तालुक्यात चारित्र्याचा संशय घेत पतीने केला पत्नीचा निघृण खुन, संशयीत आरोपीस अटक

 



शहादा तालुक्यात चारित्र्याचा संशय घेत पतीने केला पत्नीचा निघृण खुन, संशयीत आरोपीस अटक 

 म्हसावद ता.शहादा दि.२५(अब्बास भिल):

शहादा तालुक्यातील लक्कडकोट येथे पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेवून पतीने आपल्या पत्नीचा कपाशीच्या शेतात निघृण खुन केल्याची घटना घडली असून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह कपाशीच्याच शेतात पुरून दिले.याबाबत आरोपीस अटक करण्यात आली असून म्हसावद पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    याबाबत पोलीस सुत्रानुसार माहीती अशी की,सोमवारी संध्याकाळी लक्कडकोट येथील रविंद्र ठोबा पावरा(43) हा त्याची पत्नी मंगीबाई रविंद्र पावरा(40) हिला लक्कडकोट ते तलावडी रस्त्यावर चिरडे शिवारातील चिंध्या तुंबड्या  पावरा यांच्या कपाशीच्या शेतात घेवून गेला. तिथे त्याने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेवून मारहाण केली.तिचा हाताच्या बोटाने गळा दाबून, बुक्क्यांनी मारहाण करीत ,अणूकूचीदार दगडाने डोक्यावर, कपाळावर,डाव्या डोळ्यावर गंभीर जखमा करून जीवे ठार मारले. खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह  त्याच कपाशीच्या शेतात खड्डा करून पुरून दिले. याबाबत लक्कडकोटचे पोलीस पाटील सखाराम शंकर पावरा यांनी फिर्याद दिल्यानुसार म्हसावद पोलीसात भादवी कलम 302, 201  प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत मंगीबाई पावरा हीस चार मुली,एक मुलगा असून या घटनेमुळे संतप्त प्रतिक्रीयेसह हळहळही व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीस म्हसावद पोलीसांनी रात्रीत अटक केली असून.याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार पुढील तपास करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने