चोपडा भारतीय जनता पार्टी ग्रामीण व शहरच्या वतीने निषेध आंदोलन


 


चोपडा भारतीय जनता पार्टी  ग्रामीण व शहरच्या वतीने निषेध आंदोलन

चोपडा दि.११(प्रतिनिधी)  भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टी चोपडा ग्रामीण व शहर च्या वतीने*ड्रग्स चे आरोपी यांना वाचवण्यासाठी प्रामाणिक अधिकारी वर्ग व त्यांच्या परिवारातील सदस्यांवर विविध आरोप करून बदनामी करणारे महाराष्ट्र सरकार मधील नवाब मलिक यांचा पुतळा जाळून भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टी चोपडा तर्फे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला 

     चोपडा तालुक्यात तीव्र आंदोलन करून  राष्ट्रवादी काँग्रेस च्या मंत्र्याला मंत्रीपदावर असणे हे लोकशाही ला घातक आहे असा आरोप करीत  मंत्र्यांच्या  राजीनाम्याची मागणी करून या प्रवृत्ती चा निषेध भाजपा तर्फे करण्यात आला 

यावेळी उपस्थित तालुक अध्यक्ष पंकज पाटील,शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील उर्फ पंपु दादा, ता उपाध्यक्ष युवा मोर्चा  विवेक गुजर,युवा मोर्चा शहर अध्यक्ष तुषार पाठक,व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवि मराठे,सरचिटणीस चंद्रकांत धनगर,सरचिटणीस मनोहर बडगुजर,सरचिटणीस सुनिल सोनगीरे,बुथ सहयोजक विजय बाविस्कर,सोशल मिडीया अॅप प्रमुख धर्मदास पाटीलकार्यालया मंत्री मोहीत भावे,जेष्ठ नेते लक्ष्मण चौधरी संचालक हिंमत राव आबा,भटक्या विमुक्त तालुका अध्यक्ष नंदलाल धनगर,सोशल मिडीया ता प्रमुख विजय पाटील*ह भ प शाम महाराज,अश्रय जोहरी दत्तात्रय पाटील, चंद्रशेखर ठाकरे अभिषेक सुर्यवंशी प्रविण धनगर,अल्पसंख्याक ता अध्यक्ष संजय श्रावगी भुषण महाजन यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने