कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरांचे वाहतूक करणारे दोन वाहने जप्त, चार जणांना अटक


 


कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरांचे वाहतूक करणारे दोन वाहने जप्त, चार जणांना अटक

म्हसावद,ता.शहादा दि.( प्रतिनिधी):-

शहादा तालुक्यातील  दरा फाट्यानजीक सकाळी सहा वाजता विनापरवाना बेकायदेशीररित्या वाहनांमध्ये कोंबून कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरांचे वाहतूक करणारे दोन वाहने पोलिसांनी जप्त केली आहे.भल्या पहाटे कारवाई करत पोलिसांनी दोन वाहने व १२ जनावरे असा सुमारे ११ लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे यात चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.शहादा पोलिसांनी ही कारवाई केली आहे

      पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहादा खेतिया मार्गावर गुरांची अवैध रित्या वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दरा फाटा नजीक पहाटे पाच वाजता सापळा लावला त्याच वेळी (एम.एच- ०४, डी.एस.२४६१ व एम.एच.०४, सी.एफ. ३१३४) क्रमांकाच्या पिकप वाहन पोलिसांनी अडविले या  वाहनांची तपासणी केली असता त्यात बेकायदेशीररित्या गुरांना कोंबण्यात आले होते ही गुरे मालेगाव येथे कत्तलीसाठी नेली जात होती. पोलिसांनी ही दोन्ही वाहने व त्यात कोंबलेले बारा गुरे जप्त केली वाहनांची किंमत १०लाख व गुरांची किंमत १ लाख १३ हजार असा सुमारे ११ लाख १३ हजार किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.याप्रकरणी शेख नफीस शेख हनीफ,  अकलाख मोहम्मद अक्रम, साजिद खान शहीद खान, व शेख सादिक शेख मुसा सर्व राहणार मालेगाव या चार  जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.चारही संशयातांच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल अनमोल राठोड यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम प्राण्यांना निर्दयतेने वाढविण्यास प्रतिबंध अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम आधी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तारासिंग वळवी करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने