चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका म्हणतात.. आम्हालाही निलंबित करा..!* *छेडले आंदोलन*

 



चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका म्हणतात.. आम्हालाही निलंबित करा..!
* *छेडले आंदोलन*

चोपडा दि.१५(प्रतिनिधी)
नगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 11 जणांचा बळी गेला. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांसह आणखी पाच जणांचे निलंबन करण्यात आलेआहे. यामध्ये परिचारिकेचा समावेश आहे.त्यामुळे सर्व परिचारिका संतप्त झाल्या असून आम्हाला सर्वांनाच निलंबित करा, अशी मागणी करत आंदोलन सुरु केले आहे.
या निलंबनाच्या घटनेनंतर आता
वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. या प्रकरणी परिचारिकेच्या निलंबनावर अनेकांनी आक्षेप घेतलेला आहे. या घटनेला डॉक्टर व इतर जबाबदार असताना
पूर्वी परिचारिकांना कारवाई का असा थेट सवाल केला जात आहे. परिचारिकांच्या निलंबनानंतर आता संघटना आक्रमक झाली
आहे आमची काय चूक ? अग्निशामक यंत्रणा हाताळणी बसवणे हे काय आमचे काम आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.जिल्हा रुग्णालयातील सर्व परिचारिकांनी काम बंद करून आम्हाला निलंबित करा किंवा त्यांचे तरी निलंबन मागे घ्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही आमची जीव धोक्यात घालून काम केले. जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आग अग्निशमन यंत्रणा नसल्याने लागली आहे.अग्निशमन यंत्रणा बसवणे काय आमचे काम नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे झालेले परिचारिकांची निलंबन तात्काळमागे घ्या, अशी मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने