*दिव्यांग सेनेच्या कार्यात आनंद मिळतो... भारत पाटील*
धरणगाव दि.१५ ( प्रतिनिधी)
मित्रहो, सामाजिक कार्य असो वा कोणतेही असो... गरजूना अन्नदानाची मदत असो वा बेरोजगारांना रोजगाराची मदत असो किंवा शासनाच्या यंत्रणेकडून मिळणारी काही मदत असो.अनेक जण प्रामाणिकपणे काम करतांना दिसतात.
अशीच दिव्यांगांसाठी लढणारी एक व्यक्ती ती म्हणजे भारत रमेश पाटील, श्री. भारत पाटील हे अमळनेर दरवाजा भागात एक टपरीवजा दुकान चालवितात. गेल्या २००० सालापासून ते टपरीच्या माध्यमातून आपला चरितार्थ चालवताय. यासोबतच सामाजिक कार्याचीही त्यांना मनापासून आवड आहे. दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ते दिव्यांग सेनेचे एरंडोल शहराध्यक्ष
म्हणून कार्य करीत आहेत. दिव्यांगांच्या न्यायासाठी देखील झटतांना दिसतात. दिव्यांगांना शासकीय यंत्रणेमार्फत दिव्यांग कल्याण निधी मिळवून देणे आदी कल्याणकारी योजना दिव्यांगांपर्यंत पोहचवण्यासाठी अधिकारी व प्रशासनाचीही मदत त्यांना मदत होते. गेल्या २०१९ मध्ये नपाच्या करवसूलीतून ५ निधीचे अनुदान (११ लाख रूपये) १८० लाभार्थ्यांना देण्यात आले तर २०२० मध्ये १४ लाख रुपयांच्या निर्माचा लाभ २८० दिव्यांगांना झाला. सतत नपाला निवेदन देणे व पाठपुरावे करून व लाभार्थींना त्यांचा हक्क मिळवून देणं हे आमच्या दिव्यांग सेनेचं यश आहे असही भरत पाटील यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले. दिव्यांग सेनेच मोठ कार्य भरत पाटील यांच्या हातून पडत राहो हीच शुभेच्छा...