*निवडणूक म्हणजे महालक्ष्मी लॉटरी.. पाठींबा काढ - घाल हा भातुकलीचा खेळ..! काहिंचा मात्र बसत नाही ताळमेळ..! नामांकन सोबत असते ती आशा..!*
चोपडा दि.१५(हलचल रणांगणातून):
राजकारण म्हटलें म्हणजे कमी कालावधीत गडगंज संपत्ती कमविण्याचा सर्वात सोपा, सुलभ व कष्टदायक नसलेला उपाय असल्याचे सर्वश्रूत होऊ पाहत आहे आता तर काहींनी नामी शक्कल लढवत उमेदवारीचा अडसर बनत अर्ज भरत उमेदवारी माघारीतून वा जाहिर पाठींबा देण्याच्या नावाखाली माया कमविण्याचा कुटनिती आखण्यात माहिर झाले आहेत.तर काहिंच्या हाती भोपळा येण्याच्याही घटना अधिक वाढल्या असल्याचे चित्र आहे.यात लोकशाहीचा गळा आवळून रक्त पिणाऱ्या भस्मासूरांची नरकनगरीच तयार झाली आहे.त्यांच्या थयथयाटाने सर्वसामान्य माणूसही लक्ष्मीच्या लोभापायी उडी टाकतं भुईसपाट होऊ लागला आहे.तर काही राजकीय नेत्यांच्या विरोधात गरळ ओकत आता प्रसिद्धी झोतात येऊ ..पुढे खुर्ची पदरी पाडू या दमात निवडणूक आखाड्यात उतरण्यात रस घेतात.हा सर्व खेळ कशासाठी? असा प्रत्येकास पडतो.. याच उत्तर एकच आहे.. पैसा..पैसा..पैसा
पैसा दिला तर पाठिंबा हा शब्द पुढे येतो ..नाहि मिळाला तर माझी उमेदवारी पक्की आहे.. न कळत माझ्याकडून जाहिर झालं..असंही फर्मान निघत.. इतकेच नाही विरोधी गटातील काहींनी समोरच्याचे मतदान खा .. आम्ही इतके देऊ अशीही ऑफर दिली जाते.अन या गणितीय वजाबाकीचा खेळात अनेकांचे आयुष्याचे गणितच फिस्कळते.. या गोळाबेरीजेच्या आखाड्यात मात्र काहींना चारीमुंड्या चीत होऊन हास्य देऊन जातं. हा खेळवैय्या की भाडवैय्या पैलवान हे त्याला कळतं नाही..मिश्कील हास्य त्यांच्या चेहर्यावर खुलतं याचं कारण ही तसचं असतं ..ते म्हणजे फक्त न फक्तं पैसा..पैसा.. पैसा.. सबसे बडा रुपैया..! असंच म्हणावं लागेल..!
निवडणूक म्हटली की उमेदवारी, माघार ,पाठिंबा, बंडखोरी या भातुकलींचा चौसर रंगवतो खरा पण नितिमत्ता बासणात गुंडाळून खेळल्या जाणाऱ्या खेळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या लोकशाहीचा चिरफाड होतं चाललीयं हे नक्की.. ज्या लोकशाही ने जगण्याचा अधिकार तुम्हाला दिला तिचाच गळां चिरु पाहणाऱ्यानो, दल-बदलांनो आपला रंग सरड्यासारखा बदलू नका .. विविध रंग फक्त इंद्रधनुष्याला शोभतात.. मानवाला नाही..दहा मुखवटे असणाऱ्या रावणाला कधीच कोणी चांगले म्हणतोय का..? याचा विचार करा..आपला एकच मुखवटा जनतेला पाहू द्या.. दुसरा मुखवटा धारण करण्याचा प्रयत्न करू नका..नाहितर आपली गत कायं होइल याचा विचार आपण करा.. एव्हढेच या निवडणुकीच्या निमित्ताने..!