बँक दरोड्यातील आमडदेच्या तिघांना अटक.. दागिन्यांसह माल हस्तगत*

 

*बँक दरोड्यातील आमडदेच्या तिघांना अटक.. दागिन्यांसह माल हस्तगत*


भडगांव दि.२५( प्रतिनिधी )
तालुक्यातील आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत दरोडा पडला होता. याघटनेचा तीन तासात छडा लावत पोलिसांनी कसोशिने तपास करीत आरोपी बॅकेचा शिपाई राहुल अशोक पाटील याच्या सह दोन आरोपींना अटक करण्यात भडगांव पोलिसांना यश आले आहे याबाबत भडगांव पोलिसासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचाऱ्याचे कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की. दि. २२/११/२०२१
रोजीचे १७.१० ते दि. २३/११/२०२१ रोजी ०१-४०
वाजेचे दरम्यान

मौजे आमडदे ता. भडगांव येथील महाराष्ट्र ग्रामिण बँक
शाखा- आमडदे ता. भडगांव येथे कोणीतरी अज्ञात
चोरट्यांनी बँकेच्या बाहेरील तसेच आतील दरवाज्याचे
कुलुप काढून आत प्रवेश करत बॅकेच्या तारण

ठेवलेल्या सोन्याच्या तिजोरित ठेवलेल्या दोन चौकोनी
आकाराच्या स्टिलच्या डब्यात ठेवलेल्या बाजारभाव
मुल्याप्रमाणे ३१७७९८५०/- रुपये किंमतीचे
३६५५.९७ ग्रॅम वजनाचे सोने तसेच १००००/- रुपये

किमतीचा सि.सि.टि.व्हि. कैमेऱ्या चे डिव्हिआर सह
बँकेच्या बाहरेच्या मेनगेटला लावलेले २००/- रुपये
किमतीचे कुलुप असा एकुण ३१७९००५०/- रुपये
किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला म्हणुन फिर्यादी
महाराष्ट्र ग्रामिण बैंक, शाखा-आमडदे ता भडगांव,
शाखा व्यवस्थापक तन्मय अजय देशपांडे, वय - ३०,
रा. फ्लॅट नं २०१ साईरंग व्हाईटस लांडोरखोरी
उद्यानाजवळ, मेहरुण शिवार, जळगांव यांनी अज्ञात
चोरट्याविरुध्द फिर्याद दिल्यावरुन भडगांव पोलीस
स्टेशनला गुरन २७६/२०२१भादवि कलम ४५७.३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात

आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक, अशोक रावजी उतेकर यांनी मा पोलीस अधिक्षक सो। श्री. प्रविणजी मुंडे, मा. अपर पोलीस अधिक्षक सो। श्री. रमेश चोपडे, मा. उपविभागीय पोलीस

अधिकारी सो। श्री. कैलास गावडे, चाळीसगांव भाग, पोलीस निरिक्षक, किरणकुमार बकाले, (स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव) यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा कसोशीने तपास करून, सदर गुन्ह्यात भडगांव पोलीस स्टेशन चे सपोनि श्री. चंद्रसेन पालकर, पोउपनि श्री. दत्तात्रय नलावडे, सफौ/कैलास गिते पोहेको/४५विलास पाटील, पोहेका ३४७ नितिन राउते, पोना/किरण पाटील, पोना/ज्ञानेश्वर महाजन पो. कॉ. ९५ स्वप्निल चव्हाण तसेच स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांचे कडिल सपोनि श्री. जालिंदर पळे, सफौ/ अशोक महाजन, विजयसिंग पाटील, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोना/राहुल पाटील, पो. ना. रणजित जाधव, पोना/प्रतिम पाटील, पोना/किशोर राठोड, पोकॉ विनोद पाटील, पो. कॉ. ईश्वर पाटील, पोकॉ/ उमेश गोसावी, पोकॉ श्रीकृष्ण देशमुख यांच्या मदतीने कसोशिने तपास केला असता, सदरचा गुन्हा उघडकिस आणला आहे. सदर गुन्ह्यात आरोपी नामे - ०१) राहुल अशोक पाटील, वय-२४ वर्षे, ०२) विजय नामदेव पाटील, वय - ३९ वर्षे, ०३) बबलु उर्फ विकास तुकाराम पाटील, वय - ३७ वर्षे, तिन्ही रा. आमङदे ता. भडगांव यांना अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करुन सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक अशोक रावजी उतेकर, भडगांव पोलीस स्टेशन हे करित आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने