कैद्याला भेटू देण्यासाठी २ हजारांची लाच घेताना भुसावळ दुय्यम कारागृहातील तुरूंग रक्षक एसीबीच्या जाळ्यात




कैद्याला भेटू देण्यासाठी २ हजारांची लाच घेताना भुसावळ दुय्यम कारागृहातील तुरूंग रक्षक एसीबीच्या जाळ्यात


जळगाव दि.१५(प्रतिनिधी) : दोन हजारांची लाच स्वीकारताना भुसावळ दुय्यम कारागृहातील तुरूंग रक्षक अनिल लोटन देवरे यांना जळगाव एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. कैद्याला भेटू देण्यासाठी ही लाच मागण्यात आल्याचे सांगण्यात आले.


लाच स्वीकारताच केली अटक

तक्रारदार यांच्या नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल असून ते कारागृहात आहेत. कैद्याला भेटू देण्यासाठी दुय्यम कारागृहातील तुरूंग रक्षक अनिल लोटन देवरे यांनी तीन हजारांची लाच मागितली होती मात्र दोन हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली व सापळा रचण्यात आला. सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास भुसावळ कारागृहात तक्रारदाराकडून देवरे यांनी दोन हजारांची लाच स्वीकारताच त्यांना पंचांसमक्ष अटक करण्यात आली. हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील व पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्या नेतृत्वात सहकार्‍यांनी यशस्वी करण्यात आला. एसीबीच्या ट्रॅपमुळे पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने