दिव्यांग सेना व महाराष्ट्र दिव्यांग विकास महासंघ यांच्या प्रयत्नांना यश
धरणगाव दि.२(प्रतिनिधी):
धरणगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेचे पिवळे कार्ड मंजूर झाले असून तालुक्यातील 34 दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले. राहिलेल्या दिव्यांगा बांधवांना लवकरच कार्ड वाटप करण्यात येणार आहे. प्रांत अधिकारी साहेब व तहसीलदार साहेब यांच्या हस्ते अंत्योदय ( 35 किलो धान्य ) कार्ड वाटप करण्यात आले.त्यावेळेस दिव्यांग विकास महासंघाचे श्री पी एम पाटील सर, दिव्यांग सेना जिल्हा अध्यक्ष श्री अक्षय महाजन सर, वासुदेव वाघ धरणगाव शहराध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा पाटील, महिला उपजिल्हाध्यक्ष सरला सोनवणे,तालुका अध्यक्ष संजय पाटील, संजय धमोडे उपशहर प्रमुख, देवा महाजन, सुदाम चव्हाण, सपना चौधरी,शहर प्रमुख नंदलाल कुलथे, राजू चौधरी उपशहर प्रमुख, राजेंद्र फुलपगारे, ज्योती पाटील तसेच पदाधिकारी उपस्थित होते. अंत्योदय योजनेचा लाभ मिळणार असल्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.