कला सिद्दी फाऊंडेशन तर्फे रक्तदान शिबिर संपन्न...
जळगाव 15( प्रतिनिधी) :----
जळगाव शहरातील कला सिद्दी फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात.
याच उपक्रमा अंतर्गत शहरातील रेड क्रॉस संस्थेत रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते .
कला सिद्दी फाऊंडेशनच्या अध्यक्षा आरती शिंपी या दरवर्षी मोठ्या उत्साहाने आपल्या मुलांचा वाढदिवस पारंपरिक पद्धतीने केक कापून आणि स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करीत असतात.
गेल्या काही वर्षांपासून त्या सामाजिक काम करणाऱ्या सेवा धर्म परिवाराशी जुळल्या असताना,वाढ दिवस पारंपरिक पद्धतीने साजरा करण्या एवजी सामाजिक कार्यातून साजरा करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली .
याच प्रेरणेतून त्यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस पारंपरिक पद्धतीला फाटा देत त्यांनी साजरा करण्याचा निर्णय घेतला .
आपल्या मुलाचा वाढ दिवस हा इतरांच्या दृष्टीने जीवदान देणारा असावा म्हणून त्यांनी आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये चाळीस दात्यानी आपल रक्तदांन केले
कार्यक्रमाचा शुभारंभ प्रसंगी महापौर जयश्री महाजन, महिला आणि बालविकास अधिकारी विजय परदेशी,कला सिद्दी फाऊंडेशनच्या अध्यक्षा आरती शिंपी,सदस्य बेबीताई खोडपे,रेड क्रॉसचे पदाधिकारी उज्वला वर्मा,विनोद बियाणी इत्यादी मान्यवर उपस्थित होते..
मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
आपल्या मुलाच्या वाढदिवस निमित्ताने आरती शिंपी यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करीत समाजा साठी आदर्श घालून दिल्याचे मत महापौर जयश्री महाजन यांनी या वेळी व्यक्त केले.
तर वाढदिवसाच्या निमित्ताने अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम हे नेहमी राबविण्यात यायला हवे सामाजिक उपक्रमासाठी शासन स्तरावर ज्या काही मदत अपेक्षित आहेत त्या शासनाच्या वतीने आम्ही देण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारची प्रतिक्रिया महिला आणि बालविकास अधिकारी विजय परदेशी यांनी दिली आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि आभार प्रदर्शन आरती शिंपी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमेय शिंपी,सिद्दी शिंपी,बेबी खोडपे ,रुपाली चौधरी आदींनी परिश्रम घेतले...