आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक मानधन वाढची प्रतिक्षा

आशावर्कर‌ चित्र
 


आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक  मानधन वाढची प्रतिक्षा

मनवेल ता.यावलदि.२४(प्रतिनिधी) : राज्यातील आशा स्वंयमसेविका व गटप्रवर्तक  यांना १ जुलै २१ पासून एक हजार रुपये  निश्चित मानधन वाढ व ५०० रुपये कोवीड १९ भत्ता असे १५०० रुपये वाढवून देण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे २३ जुलै रोजी घेतला असून तीन महिने झाले तरी अद्यापही मानधन वाढ व कोवीड १९ चा भत्ता मिळाला नसल्यामुळे  आशा सेविका व गटप्रवर्तकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

  आशा स्वंयमसेविकांनी विविध मागण्यांचा पुर्ततेसाठी जून महिन्यात राज्यव्यापी संप पुकारला होता यावर राज्य सरकार व कृति समीतीच्या सयूक्त बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून राज्य भरातून आशा स्वंयमसेविका व गटप्रवर्तक यांचा आशा फल्लवित झाल्या आहेत.

२३ जून २१ रोजी आरोग्यमंत्यांनी  कृत्रि समितीच्या पदाधिकारी समेवत १ जूलै २१ पासून आशा स्वंयमसेविकांना अचुक संकलन व सादरीकरण करण्यासाठी एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोवीड १९ भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यासाठी राज्य शासनाने प्रतिवर्ष २०२ कोटी रुपये खर्च करणार असल्याचे मंत्रीमंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आले असून आशा स्वंयमसेविका व गटप्रवर्तकांना तीन महिन्या पासून वाढीव मानधना प्रतिक्षा आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने