वाढदिवसाच्या खर्चाची रक्कम दिली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला..... चि. हर्षितच्या बाबांचे व आजोबांचे कार्य कौतुकास्पद....

  


वाढदिवसाच्या खर्चाची रक्कम दिली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला..... चि. हर्षितच्या बाबांचे व आजोबांचे  कार्य कौतुकास्पद....


 चोपडा दि.२४( प्रतिनिधी) :--

       राज्यभरातील चिमुरडी बालमंडळी कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात शासना समवेत सहभागी होत असून ,आपल्या वाढदिवसाच्या खर्च टाळून सदर रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांशी त्याद्वारे संवाद साधताना दिसत आहेत तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मदतीसाठी धन्यवाद देताना या सर्व बालकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देत आहेत .या निमित्ताने राज्यभरातील बालके आणि मुख्यमंत्र्यातील हा ममत्वाचा धागा अधिक रेशीम आणि भक्कम होताना दिसत आहे.

          त्याच्याच  प्रत्यय हनुमंतखेडे खुर्द (तालुका धरणगाव ) येथील चि. हर्षित प्रशांत पाटील या चिमुकल्याचा २३ ऑक्टोबर रोजी  द्वितीय वाढदिवस धुमधडाक्यात साजरा न करता अगदी साध्या पद्धतीने फक्त औक्षण करून साजरा करण्यात आला व वाढदिवसावर होणाऱ्या या खर्चाचा अकरा हजार एकशे अकरा (११,१११) रुपयांचा धनादेश जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्याकडे वडील प्रशांत पाटील ( शिक्षक पंकज विद्यालय चोपडा ) व आजोबा एन ई पाटील ( निवृत्त शिक्षक रिंगणगाव हायस्कूल ) यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. त्यावेळी राजू पटेल, रतिलाल भाऊ, नवलसिंग राजे पाटील , आई ज्योत्स्ना प्रशांत पाटील ( ग्रामपंचायत सदस्या ) आदी उपस्थित होते.

           आपल्या सामाजिक दायित्वाचे पालन करत कोविड १९ विषाणू विरुद्ध लढताना फुल ना फुलाची पाकळी म्हणून चि. हर्षितच्या द्वितीय वाढदिवसाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केल्यामुळे वडील प्रशांत पाटील ( शिक्षक पंकज विद्यालय चोपडा)  व आजोबा एन ई पाटील( निवृत्त शिक्षक रिंगणगाव हायस्कूल) व आई  ज्योत्स्ना पाटील (ग्रामपंचायत सदस्या) यांचे परिसरातून अभिनंदन व कौतुक होत आहे .

      अशी संस्कारक्षम पिढी घडविणारे पालक आणि त्यांची पिढी ही कौतुकास पात्र असून या सर्वांच्या एकजुटीवर ,राज्यातील सर्व जनतेच्या सहकार्याने आपण कोरोना विरुद्धची लढाई नक्की जिंकू असा आशावाद करू या.....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने