कृभको च्या वतीने गणपूरला सामूहिक चर्चासत्र व छायाचित्र प्रदर्शनातून मार्गदर्शन
गणपूर,ता चोपडा ता 7:(प्रतिनिधी): कृषक भारती को -ऑपरेटिव्ह लिमिटेड मुंबई च्या वतीने येथील विकास संस्था आवारात सामूहिक चर्चासत्र व संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देणाऱ्या फलक व छायाचित्रांचे प्रदर्शन पार पडले.विकास संस्थेचे अध्यक्ष हरी पाटील अध्यक्ष होते. विदर्भ को.ऑप.मार्केटिंग फेडरेशनचे विभागीय अधिकारी संतोष होनाळे, पुणे येथील कृभको चे विभागीय व्यवस्थापक जे टी भामरे, सहकार विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक एम सी पाटील,कॉटन मार्केटिंग फेडरेशन चे व्यवस्थापक दिलीप पाटील प्रमुख पाहुणे होते. जे टी भामरे यांनी कमी खर्चाची शेती काळाची गरज असल्याचे सांगत कपाशीतील कवडी,बीजसंस्कार,खते ,माती परिक्षण यादींवर माहिती दिली.संतोष होनाळे ,शेतीमित्र ऍड बाळकृष्ण पाटील यांनी यावेळी शेती संदर्भात मते मांडली. क्षेत्र प्रतिनिधी संदीप ढाकणे यांनी प्रास्ताविक केले.महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक एम सी पाटील यांनी सूत्रसंचलन केले.कार्यक्रमासाठी सचिव प्रकाश राणे ,छगन पवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला माधवराव पाटील,विकास संस्थेचे सर्व सदस्य ,विविध संस्थांचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.