मराठा बटालियन चे माजी सैनिक मेजर जगन्नाथ ढोले अनंतात विलीन ..सहा माजी सैनिकांनी दिली मानवंदना
*शिंदखेडा:दि.०६(प्रतिनिधी रवि शिरसाठ)*
जेव्हा देशाची गोष्ट येते तेथे सैनिक तर येतोच, कारण त्यांच्याशिवाय आपला देश सुरक्षित ठेवणे असफल आहे.
तसेच आज रंजाणे गावातील निवृत्त सैनिक कै.जगन्नाथ भिला ढोले (फौजि नाना) ह्यांचे काल रात्री अचानक हृदयविकाराने निधन झाले.
ते संपूर्ण सिंदखेडा तालुक्यात रंजाण्याचे फौजि नाना म्हणूनच ओळखले जायचे, आणि त्यांची ही ओळख त्यांनी त्यांच्या स्वकर्तृत्वानेच निर्माण केली होती. कारण त्यांनी गावात येणाऱ्या जेष्ठ-श्रेष्ठ यांचे आदरातिथ्य केले नाही असे कधीही घडलेच नाही.
निवृत्ती नंतर त्यांनी रंजाणे गावातच बस्तान मांडले होते. गाव आणि परिसरातील इतर गावातील गावकऱ्यांची सेवा करणे हीच देश सेवा समजली आणि त्या पद्धतीने ते काल पर्यंत कार्यरत होते.
लहानपासूनच देशासाठी काहीतरी करण्याची गोडी त्यांना होती आणि सैन्यात जाऊन आपल्या देशाचे नाव रोशन करण्याची आवड होती.
गरीबीची परिस्थिती असल्यामुळे त्यांनी सैनिकाचे शिक्षण घेण्यासाठी कोणत्या कॅम्प मध्ये, किंवा शाळेत प्रवेश घेतला नाही फक्त गावातच, नदी खोऱ्यात व जंगलातच त्यांनी सराव केला. गावातील मराठी शाळेतच त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
असे करत-करत मोठे झाल्यावर त्यांच्या मेहनतिला फळ आले आणि ते सैन्यात भरती झाले, सैन्यात भरती झाल्यावर आधी त्यांना प्रशिक्षण देण्यात आले त्यात ही त्यांना खूप मेहनत करावी लागली.सैन्यात गेल्यावर जेव्हा त्यांच्या हातात बंदूक देऊन शत्रूच्या दरात उभे केले गेले असेल तेव्हा त्यांना एक गर्व आणि आनंदच वाटला असेल, आणि त्यांचे जेंव्हा हे स्वप्न पूर्ण झाले असेल तेंव्हा ते किती खुश झाले असतील ह्याचा विचार न केलेलाच बरा.अशा ह्या फौजि नानांच्या देहाला परिसरातील सहा माजी सैनिकांनी सलामी देऊन परलोकात विलीन केले हे पाहून परिसरातलील गावकऱ्यांचे मन गर्वाने फुलून गेले व फौजि नाना अमर रहे घोषणाने रंजाणे गाव दणाणले व बॅन्ड ने देशभक्ती पर गीत गाऊन गावात मिरवणुक निघाली फौजी नाना गेल्याच्या दुःखाने ग्रामस्थांचे मन विद्विग्न झाले.अशा ह्या रंजाणे गावाची शान असलेल्या देश वीराला म्र्युत्यु पश्चात त्रिवार सलाम