शिवसेनेचे उमेदवार डॉ.अब्दुल जब्बार तेली यांच्या प्रचारार्थ
ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांची सभा दणाणली
म्हसावद ,ता.शहादा ०१.:(प्रतिनिधी):शहादा तालुक्यातील म्हसावद येथे होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या पोट निवडणूक च्या प्रचारार्थ शिवसेनेचे उमेदवार डॉ.अब्दुल जब्बार तेली यांची जाहीर सभा मुख्य बाजारपेठ पार पडली या प्रचार सभेत शिवसेना उमेदवार यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांची दणदणी सभा झाली
जि.प.म्हसावद गटातील शिवसेना उमेदवार यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार,नंदुरबार जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी आले होते. यावेळी ग्रामविकास मंत्री सत्तार यांनी शिवसेना उमेदवार अब्दुल जब्बार यांना निवडून देण्याचे आवाहन केले. जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले,सहसंपर्क प्रमुख संजय उखर्डे ,युवा सेना तालुका प्रमुख ललीत जाट,ऊपसंघटक भगवान अलकारी,डाॅ.सागर पाटील, रमेश कूवर,बापू सुर्यवंशी,गणेश चित्रकथे,साळवे,मुरलीधर वळवी,विजय साळवे हे उपस्थित होते.सभेचे प्रस्तविक व सूत्र संचालन डॉ.सागर पाटील यांनी केले सभेत म्हसावद गटातील शिवसेनेचे कारकर्ते ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.