जामनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करा किसान युवा क्रांती संघटने च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन..नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावी मागणी
जामनेर दि.०२ (प्रतिनिधी):तालुक्यात मोठ्या प्रमाणात आसमानी संकट आले असून, अतिवृष्टी व वादळामुळे शेत कऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करावा व शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी अशा प्रमुख मागणीचे निवेदन तहसिलदार अरूण शेवाळे यांना तहसिल कार्यालय जामनेर येथे आज किसान युवा क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, गेल्या महिन्याभरापासून जामनेर तालुक्यामध्ये अतिवृष्टी वादळी वाऱ्यासह
पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या शेतात पावसाचे पाणी साचले असून शेतकऱ्यांच्या तोंडी आलेले पिक हिरावून गेले आहे. यामध्ये प्रामुख्याने केळी, सोयाबीन, कापुस, तुर, उडीद व फळबागा इ. पिकांची हानी झाली असून त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जामनेर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून सरसकट प्रति हेक्टरी ५०,०००/- रूपये लाभ मिळावा व ओला दुष्काळ जाहिर करावा या प्रमुख मागणीचे निवेदन संघटनेच्या वतीने तहसिलदार जामनेर यांना देण्यात आले. यावेळी किसान युवा क्रांती संघटनेला पाठिंबा देत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जामनेर तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी किसान युवा क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष जितेंद्र रामकृष्ण गोरे, अ.भा. भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष गजानन रमेश तायडे, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष योगेश पाटील सर, पोलीस मित्र जळगाव जिल्हा संघटक अश्विन रोकडे, गोपाल जाधव, सुतार जनजागृती संघटना युवा जिल्हा उपाध्यक्ष, विठ्ठल शेळके, नितीन इंगळे,पत्रकार, शेतकरी राजु पाटील मालदाभाडी आदी, शेतकरी उपस्थित होते.