कुंभारे येथे डेंग्यू आजाराचे ६ रुग्ण आढळल्याने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी गावात स्वतः केली डेंग्यू प्रतिबंध फवारणी *

 




कुंभारे  येथे डेंग्यू आजाराचे ६ रुग्ण आढळल्याने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी गावात स्वतः केली डेंग्यू प्रतिबंध फवारणी *

शिंदखेडा दि.२४ (प्रतिनिधी:- रवि शिरसाठ )

 आज दि.२४/१०/२१ वार रविवार रोजी कुंभारे ता शिंदखेडा डेंग्यू आजाराचे ६ रुग्ण आढळून आले ते दवाखान्यात दाखल केली असून त्यातुन काही रुग्णांनची तब्येत जास्त प्रमाणात खराब झाली आहे तरी आज पर्यंत कुठल्याच प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कडून या गावाकडे लक्ष देऊन डेंग्यू आजारांवरील प्रतीबंधक औषधाची फवारणी किंवा फाॅगींग करण्यात आली नाही तरी यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांना याची माहिती मिळताच आज रोजी त्यांनी स्वतः कुंभारेगावातील तरुण युवकांना सोबत घेऊन डेंग्यू च्या डासाचा प्रादुर्भाव प्रतीबंधक औषधाची फवारणी संपुर्ण कुंभारेगावात केली शानाभाऊ सोनवणे यांनी गावकऱ्यांना विनंती देखील केली की गावात एक दिवस कोरडा दिवस पाळावा कारण डेंग्यू आजाराचे डास हे स्वच्छ पाण्यात अंडी घालतात व त्यामुळे आपल्या घरात जिथे उगडे पाण्याचे भांडे दिसले तिथे हे डास अंडी घालतील व डेंग्यू आजाराचा प्रसार वाढेल याला आळा घालण्यासाठी घरातील पाणीचे भांडी स्वच्छ धुवून कोरडे करावेत व नंतर पाणी भरावे जेने करुन डेंग्यू चा प्रसार आपल्या गावाबाहेर काढता येईल असा संदेश गावकऱ्यांना दिला त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे कुंभारेगावातील मयुर संजय कदमबांडे युवा सेना उपतालुकाप्रमुख शिंदखेडा,धोंडू आपा उपसरपंच,नगराज दादा,दिलीप दादा कदमबांडे, जितेंद्रसिंग राजपूत,भैय्या दादा,संदीप राजपूत,अभिजीत राजपूत,कल्पेश गोसावी,भटू गोसावी,अनिल राजपूत सह गावातील अनेक जेष्ठ नागरिक व गावकरी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने