आदिवासी संघर्ष समिती तथा आदिवासी कोळी महासंघची तालुका बैठकीचे आयोजन 26 रोजी
रावेर दि.२४(प्रतिनिधी) :
रावेर तालुक्यातील सर्व कोळी समाज बांधवांसाठी दि. २६/१०/२१ वार.. मंगळवार वेळ.. १२.०० वाजता सावदा रेस्ट हाऊस येथे महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. कोळी समाजाचे भव्य असे महा अधिवेशन शेगाव येथे दि. ७/११/२१ रोजी होत असल्याने अधिवेशनाच्या पुर्ण तयारीच्या नियोजनासंदर्भात आढावा घेण्यासाठी ही बैठक होतं आहे
तरी बैठकीस सर्व पदाधिकारी व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सुनिता तायडे जिल्हाध्यक्ष महीला आघाडी,विश्वनाथ कोळी जिल्हा सरचिटणीस,मनोहर कोळी तालुका अध्यक्ष,चंद्रकांत कोळी यु. तालुका अध्यक्ष,दत्तात्रेय तायडे कर्मचारी आ.ता.अध्यक्ष,सविता कोळी तालुका अध्यक्ष महीला आघाडी,तसेच सर्व पदाधिकारी व समाज बांधव रावेर तालुका यांनी केले आहे