चोपडयात २९ रोजी विज तोडणी विरोधात रास्तारोको आंदोलन..शेतकऱ्यांत प्रचंड संताप*

 




*
चोपडयात २९ रोजी विज तोडणी विरोधात रास्तारोको आंदोलन..शेतकऱ्यांत प्रचंड संताप*
चोपडा दि.२७(प्रतिनिधी): विज मंडळाची हुकूमशाही अन् सरकारची चुप्पी व निसर्गाचा मारा हे 'तीन यार मिल बैठे है ।' तर मग सांगा बर ! शेतकरी कसा वाचेल, वाचविणारेच शेतक-यांच्या जिवावर उठले आहेत तर वाचविणार कोण? आता शेतकऱ्यांना शेवटचे हत्यार काढण्याची वेळ आली आहे. ते म्हणजे रास्ता रोको आंदोलन व उपोषण. चुप्पी साधणा-यांना जागे करा, हुकूमशाही चालविणा-यांना रोका व निसर्गाचा सामना करा.
याच अनुषंगाने चोपडा येथे विज तोडणी विरोधात शुक्रवारी सकाळी ११ वाजेला चोपडा धरणागांव व चोपडा- अंकलेश्वर या मुख्य मार्गांवर रास्ता रोको येणार आहे.
.... राज्यात वीज मंडळ ने शेती पंपची वीज तोडणी मोहीम सुरू केली आहे. या वर्षी शेतकऱ्यांचे आधीच पाऊस नसल्याने दुष्काळ नंतर ची अतिवृष्टी याने सारे पीक नष्ट झालेत हे सारे माहीत असताना, वीज तोडणी करणे क्लेशदायक असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

ज्या शेतकऱ्यांना भरण्याची ईच्छा आहे किंवा त्यांचे कडे पैसे आहेत त्यांनी ते निश्चित भरावे त्याला संघटनांचा विरोध नाही, पण ज्यांच्या कडे घराची वीज बिल भरण्याची देखील ऐपत नाही त्यांनी कुठून एव्हढे पैसे आणावे?
वीज मंडळ शेतकऱ्यांना खोटी वीज बिल देते, खानदेशातील शेतकरी हा शेतात रहात नाही त्याला इतर राज्यांच्या प्रमाणे मोफत किंवा अगदीच अशक्य असेल तर अश्वशक्ती वर आधारित वीज बिल द्या ते भरण्याची त्यांची नेहमीच तयारी त्यांची होती. परंतू सर्व दुनियेचा चोऱ्यांचे भार आम्हाला भरमसाठ खोटी वीज बिल दाखवून भरायला लावून शेतकऱ्यांना छळू नका असे एस बी पाटील यांनी म्हटले..

शेतकरी संघटित होत नसल्याने ओळखून अधिकारी आता देखील ते ठराविक मंडळ मध्ये ठराविक शेतकऱ्यांचे वीज तोडणी करीत आहेत.... खाटीक कडे दहा बकरे आहेत आज एक कापला म्हणजे बाकीच्यांना जीवनदान असे नाही तर फक्त नंबर उद्या की परवा एवढाच फरक.... असे देखील त्यांनी सांगितले. वीज मंडळाचे या कार्यवाही विरोधात आम्ही शुक्रवारी दिनांक २९/१०/२०२१रोजी अकरा वाजे पासून चोपडा अंकलेश्वर महामार्गावर व धरणगाव रस्त्यावर संपूर्ण चोपडा तालुक्यात रास्ता रोको केला जाईल, व याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील असे निवेदन तहसीलदार अनिल गावित व पोलीस निरीक्षक, चोपडा शहर, यांना दिले. यावेळी शेतकरी कृती समितीचे एस बी पाटील, रवींद्र निकम, मेहमूद बागवान, मनसे नेते अनिल वानखेडे, राष्ट्रवादी नेते नारायण पाटील, भाजप नेते नरेंद्र पाटील, शेतकरी संघटनेचे किरण पाटील, सचिन शिंपी, अजित पाटील यांचेसह शेतकरी प्रतिनिधी तुकाराम बाविस्कर, शांताराम हीवराये, मनीष महाजन, मोहन पाटील, मनोज पाटील, कुलदीप सिंह पाटील, रावसाहेब पाटील, राजन पवार, महेंद्र पाटील, यांचेसह व असंख्य शेतकरी हजर होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने