चोपडा तालुका अनुदानित वसतीगृह कर्मचारी संघटनेची नुतन कार्यकारिणी जाहीर..* *अध्यक्षपदी शरद पवार तर उपाध्यक्षपदी योगेश पाटील यांची बिनविरोध निवड*

 






चोपडा तालुका अनुदानित वसतीगृह कर्मचारी संघटनेची नुतन कार्यकारिणी जाहीर..
* *अध्यक्षपदी शरद पवार तर उपाध्यक्षपदी योगेश पाटील यांची बिनविरोध निवड*

चोपडा दि.०३(प्रतिनिधी) : तालुक्यातील अनुदानित वसतीगृह कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी बैठक नुकतीच घेण्यात आली असून तालुका अध्यक्षपदी शरद भगवान पवार यांची तर उपाध्यक्षपदी योगेश भिकनराव पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.जेष्ठ मार्गदर्शक म्हणून संजीव शिरसाठ यांची वर्णी लागली आहे.
नुतन कार्यकारिणीवर सचिव-प्रशांत शांताराम पाटील, खजिनदार सतिष गोकुळ दास माळी, पदाधिकारी सदस्य: मिनाबाई रामराव पाटील, दीपक सखाराम महाजन, जितेंद्र सुरेश सोनवणे,प्रकाश वामन सूर्यवंशी,छोटू भुरा पाटील,मोहन जिरभान बारेला,छगन शिवदास माळी, गणेश सुरेश बडगुजर, सुधाकर मधुकर पाटील, ज्ञानेश्वर रमेश सोनगीरे, श्रीमती शिला भास्कर बडगुजर,सौ.कावेरी गोकुळ कोळी, जितेंद्र हिंमत माळी यांची निवड करण्यात आली आहे.उपरोक्त निवडीबद्दल नवनिर्वाचित कार्यकारिणी सर्वत्र जोरदार अभिनंदन करण्यात आले आहे तरी या कार्यकारिणीची आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांत नुतन कार्यकारिणी होऊन जोरदार संघटन व्हावे अशी चर्चा सर्वानुमते झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने