शिंदखेडा तालुक्यात पोटनिवडणुकीत भाजपाचे वर्चस्व.. राष्ट्रवादीला २ जागा*


 


*शिंदखेडा तालुक्यात पोटनिवडणुकीत भाजपाचे वर्चस्व.. राष्ट्रवादीला २ जागा* 

शिंदखेडा दि.०६ ( प्रतिनिधी रवि शिरसाठ )शिंदखेडा तालुक्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत  जि.प.गट व पं.स.गणात भाजपाने जोरदार विजय मिळवत महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत करत आपला झेंडा फडकविला आहे.गटात ३ तर गणात ४ विजयश्री खेचून आणली आहे.तर महाविकास आघाडीने गट व गणात प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.त्या दोन्ही जागा राष्ट्रवादीने काबिज केल्या आहेत.काॅग्रेस व सेनेला मात्र अपयश पत्कारावे लागले आहे.   ‌  जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत मालपुर गटातून महावीरसिंह रावल (भाजपा)हे विजयी झाले आहेत तरबेटावदमधून:- ललित मधुकर वारूडे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी बाजी मारली आहे.खलाणे:- सोनी युवराज कदम (भाजपा),नरडाणा:- संजीवनी सिसोदे (भाजपा)   यांनी गड काबीज केला आहे.         तसेच पंचायत समिती गणातून         शिंदखेडा पंचायत समिती गण (विजयी)खर्दे बुद्रुक :- भाग्यश्री दिपक पाटील (राष्ट्रवादी)  ,  दाऊळ   :-  वंदनाबाई भारत ईशी  (भाजपा).,वर्शी      :- अनिता राकेश पवार  (भाजपा)  ,मेथी     :-  रणजीत गिरासे  (भाजपा ) हातनूर  :-  पंडित बोरसे (भाजपा).        हे उमेदवार विजयी झाले आहेत.यात पाच पैकी चार जागांवर भाजपाने बाजी मारून महाविकास आघाडीचा दारून पराभव केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने