कुंभारे येथे डेंग्यु आजाराचे ६ रूग्ण आढळल्यानंतर धमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात येणारे लोहगाव, कुंभारे, कळगाव, रंजाणे व जसाणे येथे डास नाशक धुराळणी...
शिंदखेडा दि.२६(प्रतिनिधी):- रवि शिरसाठ तालुक्यातील कुंभारे येथे डेंग्यु आजाराचे ६ रूग्न आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेत डास नाशक धुराळणी करण्यात आली..
सविस्तर वृत्त असे कुंभारे येथे २४ /१०/२०२१ वार रविवार रोजी डेंग्यु् आजाराचे ६ रूग्ण आढळुन आल्या नंतर रूग्नांना दवाखान्यात दाखल ही करण्यात आलेले असुन तद नंतर धमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र रंजाणे मधील कुंभारे,लोहगाव, कळगाव, रंजाणे, जसाणे, येथे रात्री उशीरापर्यंत धुराळणी करण्यात आली व गावात एक दिवस कोरडा दिवस पाळावा कारण डेंग्यु आजाराचे डास हे स्वच्छ पाण्यात अंडी घालतात व त्या मुळे आपल्या घरात जिथे उघडे पाण्यांचे भांडे दिसले तिथे डास अंडी घालतात व डेंग्यु आजाराचा प्रसार वाढतो याला आळा घालण्यासाठी घरातील पाणी चे भांडे स्वच्छ धुवुन कोरडे करावेत व नंतर पाणी भरावे जेणे करून डेंग्यु चा प्रसार आपल्या गावाबाहेर काढता येईल असा संदेश मेडीकल आॅफिसर डाॅ. रूचिता पवार यांनी दिला .. तसेच गावातील नळ आठवड्यातून एक दिवस बंद राहतील असेही या वेळी सरपंच वीरेंद्र वाडीले यांनी ग्रामस्थांना सांगीतले
यावेळी डाॅ. रूचिता पवार (मेडीकल आॅफिसर) के.डी.ओतारी ( आरोग्य सहाय्यक)डी.एम गवळे (आरोग्य सहाय्यक) डी.जे.वसावे, (आरोग्य सेवक) आशा वर्कर्स व तुषार साळवे (ग्रामसेवक) वीरेंद्र वाडीले (सरपंच ) विश्वदिप राऊळ (उपसरपंच) सुनिल मोरे ( पोलीस पाटील) जितेंद्र वाडीले(ऑपरेटर) सह ग्रामपंचायत सदस्य, शिपाई व गावातील जेष्ठ नागरीक व गावकरी उपस्थित होते