संजय गांधी निराधार योजना समीतीवर संदिपभैय्या सोनवणे

 



संजय गांधी निराधार योजना समीतीवर संदिपभैय्या सोनवणे 

मनवेल ता.यावल  दि.02(वार्ताहर ) वढोदा येथील ग्रामपंचायत सरपंच  संदिपभैय्या प्रभाकर सोनवणे यांची यावल तालुका संजय गांधी निराधार योजना समीतीच्या सदस्यंपदी निवड करण्यात आली.

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील आ.शिरीषदादा चौधरी यांच्या शिफारस नुसार जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या तालुका कार्यकरणीत संदिपभैय्या सोनवणे यांची वर्णी लागल्यामुळे सर्वस्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.

ग्रामीण भागात अनेक गोरगरीब गरजू लाभार्थी संजय गांधी निराधार योजना पासून वंचित आहे.तर घरातील कर्ता पुरुष मयत झाल्यावर अनेक कुटुंब उघड्यावर आले असून त्याना राष्ट्रीय अर्थसाह्याक योजनेच्या लाभ मिळुन देण्यासाठी कटीब्ध असल्याचे संदिपभैय्या सोनवणे यांनी सागीतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने