चिमठाणे बुराई नदीवरील पुलाचा मातीचा भराव खचल्याने साईड पट्टीत कंटेनर फसला...
चिमठाणे( परिसर -प्रविण भोई) :सोनगीर दोंडाईचा महामार्गावरील चिमठाणे बुराई नदीच्या पुलावर खड्यांमुळे समोरुन येणाऱ्या वाहनास साईड देतांना व खड्डे टाळताना कंटेनर पुलाची साईडपट्टीतील भराव खचल्याने कंटेनर फसला...सोनगीर दोंडाईचा रस्ता म्हणजे वाहनधारकांना मृत्यूचा सापळा म्हटला तरी चालेल.कारण सोनगीर दोंडाईचा रस्त्यात रस्त्यात खड्डे आहेत की खड्यात रस्ता हेच वाहन धारकांना..समजत नाही.या मुळे या पूर्वी या रस्त्यात खूप अपघात झाले मात्र..संबधीत विभागाला काय जाग येत नाही.. चिमठाणे पुलावर जणू काय खड्यांची रांगोळीच टाकलेली आहे की काय असा भास वाहन धारकांना होतो...सोनगीर दोंडाईचा रस्त्याला जणू काय वाऱ्यावर सोडल्यासारखा प्रकार आहे..याला कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न लोकांना पडलेला आहे..कारण वाहन चालवताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते...एक खड्डा टाळला की दुसरा तयारच आहे....या मुळे या रस्त्याला अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे.या मुळे हा रस्ता खड्ड्यांचे माहेर घर म्हटले तरी वावगे ठरणार नाही....कारण रस्त्याची खूप दुर्दशा झालेली आहे.. पूर्ण रस्ताच खड्डेमय झाला आहे...लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे.......
महाराष्ट्रात सर्वाधिक.दुरवस्था.....
देशात 2020 या वर्षात 3564 लोकांचा मृत्यू रस्त्यावरील खड्ड्यांच्या अपघातामुळे झाला आहे..केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून माहिती समोर आली आहे.....आणि महराष्ट्रात सर्वाधिक रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे स्पष्ट झालं आहे...देशाच्या विकासाठी रस्ते असने आणि योग्य स्थितीत असणे आवश्यक आहे..मात्र खड्यांमुळे जाणारे जीव आणि होणारे नुकसान देशाच्या विकासाठी बाधक ठरत असल्याचे दिसून येत आहे...