सहा जिल्हा परिषदांचे निकाल जाहीर, धुळ्यात भाजपचं वर्चस्व कायम राज्यातीस 85 जिल्हा परिषदा आणि 144 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू
मुंबई ,दि.०६: राज्यातीस 85 जिल्हा परिषदा आणि 144 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे रिक्त झालेल्या 229 जागांसाठी राज्यात सहा जिल्हा परिषदात पोटनिवडणूक झाली. नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदूरबार, पालघर या सहा जिल्हा परिषदांसाठी मंगळवारी मतदान झालं होतं.
राज्यातील सहा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. धुळे जिल्ह्यात भाजपनं पुन्हा आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. भाजपचे माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी पुन्हा शिंदखेडा तालुक्यात आपले वर्चस्व कायम राखण्यास यश मिळवले आहे. लामकानी जिल्हा परिषद गटातून गुजरातचे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची कन्या धरती देवरे या विजयी झाल्या आहेत.
धुळे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता...
सध्या धुळे जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. 56 पैकी 27 जागा भाजपकडे आहेत. शिवसेना 2, राष्ट्रवादी 3 तर काँग्रेसकडे 6 जागा आहेत. धरती देवरे यांच्या विजयानंतर भाजपला बहुमत मिळाले आहे.
लामकानी गावातील भाजपच्या उमेदवार धरती देवरे सुमारे 4 हजार 96 मतांनी विजयी झाल्यात. धरती या गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (आर.सी.पाटील) यांच्या कन्या आहेत. धुळ्यात भाजपला बहुमतासाठी 14 पैकी दोन जागांची गरज होती. या ठिकाणी जिल्हापरिषद 15 आणि पंचायत समितीच्या 30 जागांसाठी मतदन झालं होतं.
अकोला जिल्हा परिषदेच्या 14 पैकी 13 जागांचे निकाल हाती
वंचित बहुजन आघाडीला बहुमत
वंचित : 05
अपक्ष : 02
शिवसेना : 01
राष्ट्रवादी : 02
भाजप : 01
काँग्रेस : 01
प्रहार : 01
धुळे जिल्हा परिषदेत भाजपनं राखला गड, काँग्रेसचा धुव्वा
- भाजप - 5
- काँग्रेस - 00
- राष्ट्रवादी काँग्रेस - 02
- शिवसेना - 01
वाशिममध्ये राष्ट्रवादीची सरशी
जिल्हा परिषद 14-14
भाजप-02
शिवसेना-01
राष्ट्रवादी-05
काँग्रेस-02
वंचित – 02
इतर-02
नागपूर: गुमथळा सर्कलमधून अनिल निधान पहिल्या फेरीत मागे, अनिल निधान भाजपचे
दवलामेटी पंचायत समिती मध्ये भाजपच्या ममता जैस्वाल विजयी
जिल्हा परिषद शिवसेना एका जागेवर विजयी
शिवसेनेच्या उमेदवार विनया विकास पाटील 6200 मतांनी विजयी
नंदुरबार म्हसावद गटात काँग्रेसच्या हेमलता शितोळे 2924 मतांनी विजयी
अक्कलकुवा जिल्हा परिषद गटातील काँग्रेस उमेदवार विजयी
नंदुरबार काँग्रेस उमेदवार रेहाणाबेन मक्रणी विजयी
कापडणे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किरण गुलाबराव पाटील आघाडीवर
भाजपचे उमेदवार रामकृष्ण खलाने कट्टर विरोधक
अकोला जिल्हा परिषद : (विजयी/आघाडी)
निवडणूक झालेल्या एकूण जागा : 14
1) अकोलखेड : जगन्नाथ निचळ : शिवसेना
2) घुसर : शंकरराव इंगळे वंचित
3) लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे : अपक्ष
4) अंदूरा : मीना बावणे : वंचित
5) दगडपारवा : सुमन गावंडे : राष्ट्रवादी
6) अडगाव : प्रमोदीनी कोल्हे : अपक्ष
7) कुरणखेड : सुशांत बोर्डे : वंचित
8) बपोरी : माया कावरे : भाजप
9) शिर्ला : सुनील फाटकर : वंचित
10) देगाव : राम गव्हाणकर : वंचित
11) दगडपारवा : किरण अवताडे मोहोड : राष्ट्रवादी
12) दानापूर : गजानन काकड : काँग्रेस
13) कुटासा : स्फूर्ती गावंडे : प्रहार
एकूण जागा : 14
निकाल जाहीर : 13
वंचित : 05
अपक्ष : 02
शिवसेना : 01
राष्ट्रवादी : 02
भाजप : 01
काँग्रेस : 01
प्रहार : 01