*विचखेडा- अनवर्दे परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस.. पिकांचे प्रचंड नुकसान.. बळीराजा हवालदील*
विचखेडा,ता.चोपडा दि.०६ (प्रतिनिधी चंद्रकांत पाटील) :चोपडा तालुक्यातील घाडवेल,विचखेडा,धूपे बूद्रूक, अनवर्दे-बुधगाव परिसरात विजांच्या कडकडाटात जोरदार तुफानी पावसाने हजेरी लावली असून सुपारीच्या आकाराची गारांचा वर्षाव झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे तरी ताबडतोब नुकसानीचे पंचनामे करून बळीराजा च्या मदतीला शासनाने धावून यावे अशी जोरदार मागणी होत आहे.दुपारी २:० वाजेनंतर पावसास सुरवात झाली त्यासोबत गारांचीही सुरूवात झाली सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.