*शिदखेडा तालुक्यातील  भडणे येथील पशुपालक  गुरांवर,लम्पी स्किन आजारांमुळे  हैराण, पशुधारकांमध्ये गुरे दगावण्याची भिती* *वेळीच शिबीर लावुन उपाययोजना करण्याची मागणी*        

  शिंदखेडा तालुका प्रतिनिधी दि. ( यादवराव सावंत )

शिंदखेडा तालुक्यातील भडणे गाव हे चार हजार लोकवस्ती असून गावात मोठ्या प्रमाणात दुभती जनावरे असून येथील गावकरी मोठ्या प्रमाणावर दुधाचा व्यवसाय केला जातो, तर गावातील  दुभती जनावरांची दूधपुरवठा करतात येथे मागील आठवड्यापासून शेतकरी पशुपालक आपल्या दूध देणारे दुभती जनावरे  मात्र काही दिवसांपासून,गाई म्हैस बैलांवर शरीरावर बारीक बारीक पुळया येतात तसेच पायाला सूज येते व चारा कमी प्रमाणात खातातव एकाच दिवसात दुभती जनावरे दूध,कमी होते यामुळे लम्पी स्किन आजारांचे लक्षण गुरांवर दिसून येत असल्याने शेतकरी वर्ग भयभीत झाला असून गावातील गरीब शेतकरी राघो संतोष माळी यांनी खासगी डॉक्टर कडे लम्पी स्किन  या आजारासाठी औषध उपचारासाठी पाच सहा हजार रुपये खर्च करून देखील त्याला यश आले नसल्याने यांचा चाळीस हजाराचा बैल या आजारामुळे दगावल्याने त्यांच्यासमोर आजच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भडणे गावात या आजारामुळे दररोज खासगी डॉक्टरांकडे 40 ते 50 पशुपालक आपल्या गुरांवर औषध उपचार करीत आहेत परिसरातील शेतकरी या आजारामुळे भयभीत झाले असून या आजारावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज पशुपालकांनी असून आरोग्य विभागाने गुरांसाठी शिबीर लावावे  अशी,मागणी पशू धारकांकडुन करण्यात येत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने