युवकाने घेतली फाशी.. करणखेडे गावात सर्वत्र हळहळ
अमळनेर दि. ३०(प्रतिनिधी): तालुक्यातील करणखेडे गावातील घटना!
भटू दगडू वानखेडे हा 35 वर्षीय युवक साडीचा फास लावून लटकलेला असल्याचे तुळशीराम पवार यांचे कडून कळाल्याने रवींद्र युवराज वानखेडे यांनी मारवड पोलीस ठाण्यात खबर दिली.
भटू वाघ याने कारणखेड्यात आंबेडकर नगर येथे साडीचा फासा मुळे मृत्यू झाला अशी प्राथमिक नोंद झाली असून हा घात की आत्मघात या दिशेने तपास व्हावा.मारवड पोलीस ठाण्याचे इंचार्ज जयेश खलाने यांचे मार्गदर्शना खाली सहाययक फौजदार बाळकृष्ण शिंदे पुढील तपास करीत आहे.