पंचायत राज कमिटी च्या वतीने गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांचा अभिनंदनाचा ठराव....*

 




*पंचायत राज कमिटी च्या वतीने गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांचा अभिनंदनाचा ठराव....*


धरणगांव दि.३० (प्रतिनिधी)- पंचायत राज कमीटीच्या दौऱ्यानिमित्त आलेल्या मान्यवरांनी धरणगावचे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक दामू बिऱ्हाडे यांचा अभिनंदनाचा ठराव केला.

शिक्षक म्हणुन सुरु केलेल्या नोकरीत राहुन ग्रॅज्युअट, पोष्टग्रॅज्युअट होऊन, एम.पी. एस.सी.चा अभ्यास करुन शिक्षण विभागात अधिकारी होऊन ईतरांना आयुष्य घडविण्याचा आदर्श देत आज पर्यंतचे आपले निलंगा जि. लातुर पासुन ते धरणगाव जि. जळगाव येथे  शिक्षण क्षेत्रात अधिकारी म्हणुन केलेल्या वाटचालीत सम्माननीय मा. अशोक दामु बिऱ्हाडे ( गट शिक्षण अधिकारी धरणगांव जि. जळगाव . स्वत:वर आलेल्या असह्य कौटुंबिक दु:खातुन स्वत:ला व कुटुंबाला सावरुन आपल्या नोकरीच्या बाबतीतले कर्तव्य सचोटीने व कार्यतत्परतेने कर्तव्यदक्षतेने पार पाडत असतांना  सामाजिक कार्यातही ते अग्रेसर राहुन जो आदर्श ठेवला आहे. या त्यांच्या कार्यात त्यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाच्या पंचायत राज कमिटीने जळगाव जिल्हा भेटी प्रसंगी उत्कृष्ट प्रशासकीय कार्याबद्दल अभिनंदनाचा ठराव पास केला. अशा शिवराय - फुले - शाहु - आंबेडकरी चळवळीचा गाढा अभ्यासक असलेल्या अशोक डी. बिऱ्हाडे साहेबांचे खूप खूप अभिनंदन व पुढील अशाच आदर्शवत नोकरीसह कौटुंबिक  वाटचालीसाठी मंगलकामनेसह मनस्वी अगणित हार्दिक शुभेच्छा दिल्या.

              याप्रसंगी धरणगाव शहरासाठी ही अभिमानाची गोष्ट असून सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकारी मा.अशोक बिऱ्हाडे साहेबांचे अभिनंदन केले .याप्रसंगी महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.आर. सोनवणे, पर्यवेक्षक जे.एस. पवार व संपूर्ण स्टॉफ च्या वतीने आदरणीय बिऱ्हाडे साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने