*माजी कँबीनेट मंत्री आमदार संजयभाऊ राठोड.. उद्या नाशिक जिल्ह्यातील 'नांदगाव' तालुका दौऱ्यावर......*


 


*माजी कँबीनेट मंत्री आमदार संजयभाऊ राठोड.. उद्या नाशिक जिल्ह्यातील 'नांदगाव' तालुका  दौऱ्यावर......*

नाशिक दि.१८(दिलीप पाटील):

       वसई,पालघर, ठाणे,मुंबई,परभणी, जालना, नंदुरबार,धुळे,औरंगाबाद, जळगाव व सोलापूर जिल्हा दौऱ्या नंतर आता पुढील दौरा नाशिक जिल्ह्यातील *"नांदगाव विधानसभा मतदारसंघ"* क्षेत्रातील विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांसोबत आरक्षण,पदोन्नती मधील आरक्षण नॉन-क्रिमिलेयर, सामाजिक,राजकीय तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बंजारा सामाजाचा बुलंद आवाज लोकनेते माननीय माजी कॅबिनेट मंत्री आमदार संजयभाऊ राठोड येत आहेत.दौऱ्यादरम्यान या महाराष्ट्र जनसंपर्क दौऱ्याचे संयोजक व समन्वयक चित्रपट निर्माता-दिग्दर्शक व समाजसेवक प्रा.सी.के.पवार तसेच ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रमुख पदाधिकारी ,श्री शंकर पवार,श्री राजू नाईक,डॉ. टी.सी.राठोड याशिवाय नाशिक जिल्ह्यातील बंजारा समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांसह राजकीय नेतेही सोबत राहणार आहेत.


                *वेळ व स्थळ*

सकाळी : 11.00  ते  02.00

नांदगाव विधानसभा क्षेत्रातील जनता यांच्यासोबत चर्चा,संवाद व भेट 

*स्थळ* गुप्ता लॉन, नांदगाव.

दुपारी : 02.00  ते  02.30

            पत्रकार परिषद

*स्थळ*: गुप्ता लॉन्स, नांदगाव.

दुपारी: 02.30  ते  03.30 राखीव

दुपारी : 03.30 कासारी तांडा जाण्यासाठी रवाना.

दुपारी : 03.30 ते 04.00 

कासारी तांडा येथील नायक, कारभारी,जनता यांच्याशी भेट व संवाद.

दुपारी : 04.00 नयाडोंगरी तांडा जाण्यासाठी रवाना.

सायं. : 04.30 ते 05.00

नयाडोंगरी तांडा येथील नायक,कारभारी,जनता यांच्याशी भेट व संवाद.

सायं.05.00 वाजता चाळीसगांव जाण्यासाठी रवाना.

सायं.05.30 ते 06.15 राखीव

सायं.06.15 चाळीसगांव वरून मुंबईसाठी रवाना.


         

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने