आमदार लताताई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ..तालुका व्यसनमुक्ती समिती ची पहिली बैठक संपन्न
चोपडा दि.०१(तालुका प्रतिनिधी कैलास बाविस्कर)
आज तालुका व्यसनमुक्ती समिती ची पहिली बैठक आमदार लताताई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार अनिल गावीत,बीडीओ बी.एस.कोसोदे,नायब तहसीलदार राजेश पऊळ साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी तहसीलदार गावीत साहेब यांनी व्यसनमुक्ती साठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना व पुढील काळात या समिती तर्फे घेण्यात येणारे उपक्रम आणि व्यसनमुक्ती समिती चे कार्य सविस्तर समजावून सांगितले.त्यानंतर नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांचा परिचय व स्वागत करण्यात आले.यावेळी प्रविण सोनवणे, राजेंद्र पाटील, किशोर कोळी, श्यामकांत पाटील,ह.भ.प.गजानन पाटील, वासुदेव महाजन, गोविंदा कोळी, जनाबाई माळी, अनिल पाटील,दिव्यांक सावंत,नंदू गवळी,गिता ठाकरे, कविता कोळी,अंजना माळी, सुरेश ढिवरे आदी सदस्य उपस्थित होते.