तालुका क्रिडा समितीच्या बैठकीत.. आमदार लताताई सोनवणे यांनी दिल्या तालुका क्रिडा संकुलाबाबत सूचना





*तालुका क्रिडा समितीच्या  बैठकीत.. आमदार लताताई सोनवणे यांनी दिल्या तालुका क्रिडा संकुलाबाबत सूचना

चोपडा दि.०१ ( तालुका प्रतिनिधी कैलास बाविस्कर)  : प्आज तालुका क्रिडा समिती ची बैठक आमदार लताताई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार अनिल गावीत,बीडीओ बी.एस.कोसोदे,नायब तहसीलदार राजेश पऊळ  साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी तालुका क्रिडा संकुलाच्या कामाबाबत आमदार लताताई सोनवणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारांना केली व राहिलेली कामे तात्काळ पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या.तसेच तालुक्यात बांधकाम पूर्ण झालेल्या  व्यायम शाळांना व्यायमासाठीचे साहित्य पुरविण्याबाबत व व्यायम शाळा बांधकामासाठी ज्या गावांचे प्रस्ताव दाखल आहेत त्यांना तात्काळ मंजूरी देऊन त्याबाबत माहिती जिल्हा क्रिडा अधिकारी मिलींद दिक्षीत साहेब यांना दिल्या.यावेळी क्रिडा समिती चे कार्याध्यक्ष तहसीलदार अनिल गावीत, गटविकास अधिकारी बी.एस.कोसोदे,जी.यु.पाटील उप अभियंता सा.बां.विभाग,एस.के.पाटील , तालुका क्रिडा समितीचे सदस्य क्रिडा शिक्षक देविदास महाजन, संजय बाविस्कर, योगेश चौधरी,धिरज कोळी व तालुका समन्वयक राजेंद्र आल्हाट  आदी सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने