*भारतीय महिला जगात अव्वल..*टी. एम. चौधरी यांचे प्रतिपादन*

 




*भारतीय महिला जगात अव्वल..*टी. एम. चौधरी यांचे प्रतिपादन*


*चोपडादि.१४(प्रतिनिधी).   *- खान्देश कन्या डॉक्टर मोनिया केदार यांना मिस इंडिया ग्लॅमरस इको वारियर्स हा प्रथम पुरस्कार मिळाला .त्याबद्दल श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज, चोपडा व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान ,चोपडा यांचे संयुक्त विद्यमाने  श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर, श्रीराम नगर, चोपडा येथे सत्कार करण्यात आला .यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या वाचस्पती, चोपडा तेली समाजाचे उपाध्यक्ष तथा राज्य आदर्श शिक्षक प्रताप विद्या मंदिराचे निवृत्त मुख्याध्यापक श्री टी. एम. चौधरी सर होते .आपल्या अध्यक्षपदावरुन बोलताना त्यानी डॉक्टर मोनिया केदार यांनी मिळवलेले यश हे महिलांसाठी प्रेरणा देणारे असून महिलांनी प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन केले. सध्या स्पर्धेचे युग आहे.  स्पर्धेमुळे आपल्या  कलागुणांना वाव मिळतो.  भारतीय महिला या जगात अव्वलस्थानी असल्याचे नमूद कले. डॉक्टर मोनिया  केदार हिस विश्वविजेते पदासाठी शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना त्यांनी मोनिया चे वडील मुकुंद केदार सर व मातोश्री शिक्षिका सौ० उषाताई  मुकुन्द बाविस्कर यांच्याप्रती गौरव उद्गार काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष के.डी. चौधरी सर यांनी केले. सुरुवातीला प्रदेश तेली महासंघाचे तालुका अध्यक्ष श्री प्रशांत सुभाष चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉक्टर मोनिया केदार हिचा सत्कार प्रदेश तेली महासंघाच्या  तालुकाध्यक्ष सौ सीमा सुनील चौधरी, उपाध्यक्ष सौ योगिता शशिकांत चौधरी   आदि महिलांनी सत्कार केला. यावेळी डॉक्टर मोनिया केदार यांचे माता पिता यांचाही सत्कार तेली समाजाचा मार्फत करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर मोनिया केदार यांनी संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीला माल्यार्पण करून आरती केली. यावेळी चातुर मासानिमित्त आयोजित हरिपाठाची आरती  मिस इंडिया डॉक्टर मोनिया केदार ,तसेच श्री राजेंद्र श्रावण चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ निर्मलाताई राजेंद्र चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आली. ह. भ. प. श्री गोपीचंद महाराज यांनी पूजेची  उत्तम व्यवस्था केली. यावेळी के .डी. चौधरीसर त्यांचा  नातू चिरंजीव प्रीतम याचा वाढदिवस डॉक्टर मोनिया केदार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाला तेली समाजाचे विश्वस्त श्री नंदू गोविंदा चौधरी, श्री संजय कौतिक चौधरी, देवकांत के चौधरी, भिका खंडू चौधरी, प्रशांत सुभाष चौधरी, नारायण पंडित चौधरी, गोपीचंद रघुनाथ चौधरी ,यांचेसह सूर्यकांत के .चौधरी,सौ० प्रिया सूर्यकांत चौधरी,सौ० हर्षदा महेंद्र चौधरी ,सौ. नम्रता  प्रशांत चौधरी, सौ योगिता शशिकांत चौधरी, सौ सपना गिरीश चौधरी ,सौ विमल नारायण चौधरी, श्री श्रीराम झुलाल मिस्त्री, श्री जगदीश झुलाल मिस्त्री,  ह. भ. प .ज्ञानेश्वर राजाराम नेरकर, निशांत  प्रशान्त चौधरी, शशिकांत सुभाष चौधरी,राहूल श्रीराम चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने