*भडणे परिसरात लंपी आजारांचे थैमान.. खाजगी पशूधन डॉक्टरांचा सुळसुळाट..तरीही जनावरें मृत्यू च्या घटनेत वाढ.. शासकीय पशूधन विभागाने वेळीच दखल न घेतल्यास साथीचे आजार पसरण्याची शक्यता.."आन द स्पाॅट अॕक्शन"हाच एकमेव पर्याय.. गावकऱ्यांची मागणी*




 *भडणे  परिसरात लंपी आजारांचे थैमान.. खाजगी पशूधन डॉक्टरांचा सुळसुळाट..तरीही जनावरें मृत्यू च्या घटनेत वाढ.. शासकीय पशूधन विभागाने वेळीच दखल न घेतल्यास साथीचे आजार पसरण्याची शक्यता.."आन द स्पाॅट अॕक्शन"हाच एकमेव पर्याय.. गावकऱ्यांची मागणी* 


अमळथे, ता.शिंदखेडा दि.१७(प्रतिनिधी) भडणे परिसरातील  गुरांवर लंपी आजारांने हल्ला चढविला असून पशूपालकांसह दूध खरेदीदार गावकऱ्यांमध्ये प्रचंड भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे .पशूधन जीवन मरणाच्या घटीका मोजत असून सर्वत्र  शंका कुशंकांना ऊत आला आहे तरि पशू संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून जोरदार मोहीम राबवून गुरांवर तात्काळ ईलाज करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी जोरदार मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 

शिंदखेडा तालुक्यातील भडणेशेगाव गावात हजार लोकवस्ती असून  मोठ्या प्रमाणात दुभ,ती जनावरे आहेत.  येथील गावकरी मोठ्या प्रमाणावर दुधाचा व्यवसाय करतात    दुभती जनावरांची दूधपुरवठा करतात  मागील आठवड्यापासून शेतकरी पशुपालक  दूध देणारे दुभती जनावरे  मात्र काही दिवसांपासून,गाई म्हैस बैलांवर शरीरावर बारीक बारीक पुळया येतात तसेच पायाला सूज येते व चारा कमी प्रमाणात खातात व एकाच दिवसात दुखती जनावरे दूध,कमी होते यामुळे लिपी आजारांचे लक्षण गुरांवर दिसून येत असल्याने शेतकरी वर्ग भयभीत झाला असून गावातील गरीब शेतकरी राघो संतोष माळी यांनी खासगी डॉक्टर कडे लिंपि या आजारासाठी औषध उपचारासाठी पाच सहा हजार रुपये खर्च करून देखील त्याला यश आले नसल्याने यांचा चाळीस हजाराचा बैल या आजारामुळे दगावल्याने त्याच्यासमोर आजच दुःखाचा डोंगर कोसळला आहे भडणे गावात या आजारामुळे दररोज खासगी डॉक्टरांकडे 40 ते 50 पशुपालक आपल्या गुरांवरऔषध उपचार करीत आहेत परिसरातील शेतकरी या आजारामुळे भयभीत,झाले असून या आजारावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज पशुपालकांनी असून आरोग्य विभागाने गुरांसाठी शिबीर लावावे  अशी,मागणी पुशू धारकांकडून करण्यात येत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने