प्रा. राजेश श्रीराम अंजाळे यांना राज्यस्तरीय आदर्शशिक्षक गुणगौरव पुरस्कार
बोदवड दि.१८ (प्रतिनिधी): येथील न. ह रांका कानिष्ठ महाविद्यालयातील प्रा. राजेश श्रीराम अंजाळे यांना राज्य स्तरीय आदर्शशिक्षक गुणगौरव पुरस्कार शिक्षक दिनी म्हणजे 5सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात आला हा पुरस्कार मनुष्यबळ विकास अकॅडमी मुंबई यांच्या वतीने देण्यात आला हा पुरस्कार सुप्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री डॉ श्री विजयकुमार शाह यांच्या उपस्थितीत देण्यात आला यावेळी पुरस्कारप्राप्त शिक्षकांबद्दल गौरवोदगार काढले यावेळी आंतरराष्टरीय कीर्तीचे सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ सुशीलकुमार सिंग, महाराष्ट्रच्या सुप्रसिद्ध शिक्षणातज्ञ् सौ. हेमाली जोशी तसेच समारंभचे अध्यक्ष ऍड. श्री. कृष्णाजी जगदाळे यावेळी उपस्थित होते यावेळी मानाचा फेटा, मानकरी ब्याच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि माणपत्र स्वरूपात हा राज्य स्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला प्रा. राजेश अंजाळे यांना याआधीही जिल्हा स्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार दोन वेळा तसेच भारतीय दलित साहित्य अकॅडमी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप राष्ट्रीय अवॉर्ड त्यांचा शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल प्रदान करण्यात आले आहे. त्यांचा या पुरस्काराकरिता दि. बोदवड सार्व. एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री मिठूलालजी अग्रवाल उपाध्यक्ष श्री अजयभाऊ जैन सचिव श्री विकासभाऊ कोटेचा तसेच भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष तथा विद्यमान संचालक ऍड श्री प्रकाशचंदजी सुराणा संचालक वृंद मुख्याध्यापक श्री ऐन. ए.पाटील उप्प्रचार्य प्रा. पी. एम. पाटील पर्वेक्षक कनिष्ठ महाविलायचे प्राद्यापक माध्यमिक विभागाचे शिक्षक तसेच तालुक्यातील सर्व शिक्षकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या