जागतिक आरोग्य सल्लागार यांच्या तर्फे मोफत आरोग्य शिबीर*





 *जागतिक आरोग्य सल्लागार यांच्या तर्फे मोफत आरोग्य शिबीर*

चांदवडदि.१८ (तालुका प्रतिनिधी /सुनिलआण्णा सोनवणे) :चांदवड आज अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 यावेळी हॅपी टू हेल्प रहा निरोगी व आनंदी आयुष्यभर माहिती व मार्गदर्शन कार्यक्रमांतर्गत  जागतिक आरोग्य सल्लागार योगेश पवार, अमोल झिने, दिपक नरवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत  हा कार्यक्रम संपन्न झाला. 

  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चांदवड चे प्रथम नगराध्यक्ष भुषण कासलीवाल,भाजपा चे प्रदेश का.नि.स. अशोक काका व्यवहारे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस अंकुर कासलीवाल, यांच्या उपस्थितीत श्री. चंद्रेश्वर महादेव मंदिर येथे संपन्न झाला. 

यावेळी अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थिती दाखवून अनेक महिला वर्गांनी यातून आपले आरोग्य कसे निरोगी राहील याकडे लक्ष दिले. जागतिक आरोग्य सल्लागार यांच्या सल्ल्याने यापुढे दैनंदिन जीवनात आहार, व्यायाम, तसेच नैसर्गिक रित्या ज्या ज्या गोष्टींमुळे आपले आरोग्य चांगले राहील याकडे लक्ष देण्यास प्रतिसाद देण्यास पुढाकार घेण्यात आला .

यावेळी सदर कार्यक्रम संकेत छबु वानखेडे व मित्रपरिवार यांनी आयोजन असून यावेळी मुकेश आहेर,महेंद्र कर्डीले, श्रीकांत सरोदे,युवराज आहेर, विशाल ललवानी, निलेश देशमुख, योगेश व्यवहारे, दीपक गायकवाड , कुणाल साळवे , अविनाश चव्हाण, प्रसाद बोऱ्हाडे , रितेश निकम  व परिसरातिल नागरिक व महिला उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने